ETV Bharat / bharat

मालमत्ता वाटप न झाल्याने मुलं झाले निर्दयी! आईच्या निधनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासही दिला नकार - मालमत्ता वाटप न झाल्याने मुलं झाले निर्दयी

तेलंगणातील कामारेड्डी परिसरात एक अमानवी घटना उघडकीस आली आहे. मालमत्तेचे वाटप न केल्याने मुलांनी आईचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रुग्णालयात नेण्यास नकार दिला.

किश्तव्वा यांचे निधन
किश्तव्वा यांचे निधन
author img

By

Published : May 8, 2023, 3:26 PM IST

कामरेड्डी (तेलंगणा) : मालमत्तेचे वाटप न केल्याने आणि बँकेतील ठेव न भरल्याने संतप्त मुला-मुलींनी आपल्या आईचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला असल्याची अमानवी घटना समोर आली आहे. ही घटना कामारेड्डी येथे घडली आहे. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामारेड्डी येथील आरबी नगर कॉलनीतील ७० वर्षीय महिला किश्तवा आजाराने त्रस्त होती. गेल्या महिन्याच्या 21 तारखेला नातेवाईकांनी त्यांना कामरेड्डी शासकीय रुग्णालयात दाखल केले. १५ दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शनिवारी (६ मे) रात्री किश्तव्वा यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना दिली. मात्र, दोन दिवसांपासून तिची मुले-मुली रुग्णालयातून आईचा मृतदेह घेण्यासाठी आले नाहीत. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. किश्तव्वा यांचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. किश्तव्वा यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. तो कामरेड्डी येथे राहतो. किश्तव्वाच्या नावावर घर आहे. बँकेत त्यांच्या खात्यात 1.70 लाख रुपये जमा आहेत.

कोणीही पुढे न आल्यास मृतदेह अनाथ समजला जाण्याची शक्यता : ही संपत्ती आणि पैसा तीने आपल्या मुलांना न दिल्याने किश्तव्वाचे मुल व मुली तीच्यावर रागावलेले आहेत. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या एका नातेवाईकाला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. यामुळे संतापलेल्या किश्तव्वा यांची मुले अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात घेऊन आली नाहीत. रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलीस किश्तव्वा यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची वाट पाहत आहेत. कोणीही पुढे न आल्यास मृतदेह अनाथ समजला जाण्याची शक्यता असून, पालिका कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे.

आईचे निधन झाल्यानंतरही हा राग कायम : गेल्या काही दिवसांपासून या मुलांची हीच मागणी कायम होती की जी काही प्रॉपर्टी आहे ती आमच्या सर्वांच्या नावावर करावी. तसेच, त्यामध्ये सोने असेल, चांदी असेल हे सर्व आमच्या नावावर करवे अशीही त्यांची मागणी होती. मात्र, तसे, न केल्याने ते आपल्या जन्मदात्या आईवर मोठ्या प्रमाणात रागावले होते. त्यानंतर त्याचा आईचे निधन झाल्यानंतरही हा राग काही कमी झालेला नाही. चक्क त्यांनी आईचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा : Karnataka Election 2022 : भाजप देशाची संपत्ती लुटण्यात व्यस्त; प्रियंका, राहुल गांधींची जोरदार टीका

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.