ETV Bharat / bharat

Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार, अनेक ठिकाणी नक्षली चकमक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 3:58 PM IST

Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (७ नोव्हेंबर) पहिल्या टप्प्यातील मतदान झालं. मात्र या मतदानादरम्यान राज्यात ठिकठिकाणी नक्षली हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. जाणून घ्या सविस्तर.

Chhattisgarh Election 2023
Chhattisgarh Election 2023

बस्तर (छत्तीसगड) Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान नक्षली हिंसाचार झाला आहे. कांकेर, नारायणपूर, विजापूर आणि सुकमा येथे चकमकी झाल्या. तर दंतेवाडा येथे आयईडी जप्त करण्यात आले. कांकेरमध्ये चकमकीत एका शेतकऱ्याच्या पोटात गोळी लागली. तर विजापूरमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे.

शेतकऱ्याच्या पोटात गोळी लागली : कांकेरच्या बांदे येथील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. सुमारे अर्धा तास गोळीबार सुरू होता. त्यानंतर नक्षलवादी फरार झाले. या चकमकीत एका शेतकऱ्याच्या पोटात गोळी लागली. हा शेतकरी आपली गुरं चारण्यासाठी शेतात आला होता. घटनास्थळावरून ४७ शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय अनेक नक्षलवादीही ठार झाल्याची बातमी येत आहे.

२ ते ३ नक्षलवादी ठार : नारायणपूरच्या ओरक्षा येथे एसटीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दरम्यान, नक्षलवादी जंगलाच्या आडून पळून गेले. याशिवाय सीआरपीएफ जवानांनी दंतेवाडा विधानसभा मतदारसंघात झडतीदरम्यान दोन आयईडी जप्त केले आहेत. विजापूरच्या गांगलूरमध्ये देखील नक्षलवाद्यांशी चकमक झाली. सीआरपीएफच्या ८५ बटालियनसोबत ही चकमक झाली. या चकमकीत २ ते ३ नक्षलवाद्यांना ठार केल्याचा दावा सुरक्षा दलांनी केलाय.

आयईडी स्फोटात जवान जखमी : सुकमा येथे मतदान केंद्रापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर नक्षलवादी हल्ला झाला. मात्र सुरक्षा दलांनी हा हल्ला हाणून पाडला. त्यानंतर नक्षलवाद्यांना घटनास्थळावरून पळ काढावा लागला. सुकमा पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलंय. पहाटे सुकमा येथे झालेल्या आयईडी स्फोटात कोब्रा बटालियनचा एक जवान जखमी झाला होता. जखमी जवानाची प्रकृती सध्या ठीक आहे.

बस्तरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था : बस्तरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाचे सुमारे ४० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय येथे थ्री लेयर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच डीआरजी, बस्तारिया फायटर्स, पॅरामिलिटरी फोर्स आणि सीएएफचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. बस्तरचे आयजी आणि सर्व पोलीस अधिकारी स्वत: सर्व सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा :

  1. Chhattisgarh Election 2023 : येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालं मतदान, आजही दिसतो नक्षल्यांचा प्रभाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.