ETV Bharat / bharat

Chef Lata Tandon: शेफ लता टंडनने पती विरोधात पोलिसात केली तक्रार, दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणाऱ्या शेफ लता टंडन ( Chef Lata Tandon complaint against husband ) यांनी पती मोहित टंडनविरोधात सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या पतीचे अन्य महिलेबरोबर अवैध संबंध असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. पती घटस्फोटासाठी दबाव टाकत असून, छळत असल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे.

Lata Tandon domestic violence
रीवा शेफ लता टंडन
author img

By

Published : Mar 28, 2022, 12:37 PM IST

रीवा (म.प्र) - गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणाऱ्या शेफ लता टंडन ( Chef Lata Tandon complaint against husband ) यांनी पती मोहित टंडनविरोधात सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या पतीचे अन्य महिलेबरोबर अवैध संबंध असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. पती घटस्फोटासाठी दबाव टाकत असून, छळत असल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे. लता यांनी पोलिसांना त्यांच्या पतीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

माहिती देताना शेफ लता टंडन

हेही वाचा - Goa Ministers : असं आहे गोव्यातील मंत्रिमंडळ; पाहा, कुणाला मिळाली संधी?

पतीवर गंभीर आरोप : लता टंडन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्या पती मोहित टंडन यांच्या घरी गेल्या होत्या. मात्र, त्यांचे पती मोहित यांनी अपशब्दांचा वापर करत त्यांचा अपमान केला आणि घराबाहेर हाकलून दिले. पतीचे चार महिन्यांपासून एका विवाहित स्त्रीबरोबर संबंध असल्याचा आरोप लता यांनी केला. हा प्रकार कळाल्यावर कुटुंबाच्या माध्यमातून सर्वांनी मिळून मोहितची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कुणाचेही ऐकले नाही. त्याच्याद्वारे सतत धमक्या दिल्या जात असल्याचे, लता यांनी सांगितले.

Lata Tandon domestic violence
एफआईआर

कुकिंग मॅरेथॉनमध्ये मोडला होता जागतिक विक्रम : शेफ लता टंडन यांच्या नावे जागतिक विक्रम आहे. त्यांनी सर्वाधिक वेळ सतत अन्न शिजवून जागतिक विक्रम आपल्या नावी केले होते. त्यांनी दोन वर्षांपूर्व 85 तास सतत अन्न शिजवून ही कामगिरी केली होती. रीवा येथे लाँगेस्ट कुकिंग मॅरेथॉनचे (वैयक्तिक) आयोजन करण्यात आले होते. आणि या कुकिंग मॅरेथॉनची पडताळणी करण्यासाठी इंडिया बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डची टीम रीवा येथे आली होती. दोघांकडून त्याचवेळी शेफ लता टंडन यांना प्रमाणपत्र देण्यात आले होते.

Lata Tandon domestic violence
लता टंडन यांचा सन्मान होतानाचे छायाचित्र

हेही वाचा - भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या मुस्लीम युवकाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.