मुंबई: सोशल मीडिया हे आजच्या काळात इतके मोठे व्यासपीठ बनले आहे की येथे कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. कधी कधी अशा अनेक गोष्टी व्हायरल होतात. ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. हरियाणातील एका मद्यपीचे असेच एक पत्र सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. त्यामुळे हा मद्यपी सध्या चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या नावाने त्याने लिहिलेले पत्र (drunkard letter to deputy cm) हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
व्हायरल पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने आपले नाव बिरेंद्र सांगवान असे दिले आहे. तो नेमका कोणत्या जिल्ह्याचा आहे याचा त्याने पत्रात याचा उल्लेख केलेला नाही. समाज आणि पत्नीच्या टोमण्याला कंटाळून त्या मद्यपीने उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे व्हायरल पोष्ट मधे दिसत आहे. या पत्रात मद्यपी बिरेंद्र यांनी देशी दारूचा फ्लेवर बदलण्याची मागणी केली आहे. बिरेंद्र यांनी पत्रात लिहिले आहे की, आजकाल कंपन्या जी देशी दारू बनवत आहेत ती अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. आम्ही गरीब आहोत आणि गरीब माणूस फक्त देशी दारू पिउ शकतो.
जेव्हा आपण देशी दारू पितो आणि एखाद्या माणसाच्या शेजारी बसतो. त्यामुळे आमच्या तोंडाला इतकी दुर्गंधी येते की कोणीही आम्हाला जवळ बसू देत नाही. त्याचा फ्लेवर म्हणजे चव बदलली तर. तोंडातून दुर्गंधी सुटणार नाही आणि समाजातील लोक आपमच्याकडे वाईट हेतुने पाहणार नाहीत. यामुळे घरातील व्यक्तीनाही या वासाचा त्रास होणार नाही. तसेच बायकोही नाराज होणार नाही. राज्याचा महसूलही आम्ही वाढवतो. त्यामुळे आमचंही थोडे ऐकले पाहिजे.
राज्यातील तमाम मद्यपी बांधवांची ही गंभीर समस्या आहे. आपल्याकडेही हा विभाग आहे. तुम्ही या सर्व देशी दारू निर्मात्यांना दुर्गंधीतुन मुक्त करण्यासाठी आदेश देऊ शकता. आम्ही शांतता पाळणारे नागरिक आहोत. त्यामुळे आपण सर्व मद्यपी बांधवांनी या बाबीकडे लक्ष द्यावे ही अपेक्षा. बीरेंद्र यांनी हे पत्र दारू कंपन्यांनाही लिहिल्याचे वृत्त आहे, मात्र आजतागायत उत्पादन शुल्क विभाग किंवा दारू कंपनीकडून या पत्राला कोणतेही उत्तर मिळालेले नाही. बिरेंद्रने मार्च 2022 मध्ये हे पत्र लिहिले होते, आता हे पत्र अचानक व्हायरल होत आहे.