ETV Bharat / bharat

Chandrayaan 3 Live Updates : लॅंडिंगसाठी अवघे काही क्षण बाकी, कैलाश खेर यांनी गायले खास गाणे

इस्रो आज इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. चंद्रयान 3 मोहिमेतील 'विक्रम लँडर' आज सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. त्यामुळे जगभरातील नागरिकांच्या नजरा आतापासून चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर खिळल्या आहेत.

Chandrayaan 3
Chandrayaan 3 Live Updates
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 7:33 AM IST

Updated : Aug 23, 2023, 5:15 PM IST

हैदराबाद : चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडींगची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कोट्यवधी भारतीय नागरिकांसह जगभरातील खगोलप्रेमींचं लक्ष भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेकडं लागलं आहे. इस्रो आज इतिहास घडवणार असून त्याचं काऊंटडाऊन आता सुरू झालं आहे. भारताची चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वी झाली, तर दक्षिण ध्रूवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे.

Live Updates:

  • गायक कैलाश खेर यांनी चंद्रयान ३ च्या लँडिंगपूर्वी एक गाणे भारतीयांना समर्पित केले.
  • चंद्रयान मोहीम सफल व्हावी यासाठी अमरावतीतील राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी अंबादेवी मंदिरात पूजा केली. यावेळी त्यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
  • चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी श्रीनगरमधील हजरतबल दर्गा येथे विशेष प्रार्थना करण्यात आली.
  • प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी चंद्रयानाला शुभेच्छा दिल्या. आम्हाला या मोहिमेचा खूप अभिमान असल्याचे ते म्हणाले.
  • केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी दिल्लीतील गुरुद्वारा बांगला साहिब येथे विशेष प्रार्थनेमध्ये भाग घेतला.
    • #WATCH | Union Minister Hardeep Singh Puri takes part in the special ardas at Gurdwara Bangla Sahib in Delhi for the successful lunar landing of Chandrayaan-3. pic.twitter.com/nwr46WqWfK

      — ANI (@ANI) August 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्यांगना पूजा हिरवाडे यांनी 'नमो नमो भारताम्बे' आणि चंद्रायन गीतावर भरतनाट्यम सादर केले. पूजा हिरवाडे म्हणाली, भारतचे चांद्रयान-3 आज चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळे हा क्षण संस्मरणीय करण्यासाठी मी भरतनाट्यम सादर केले. संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे.
    • #WATCH | Nagpur, Maharashtra | Bharatanatyam and Kuchipudi dancer Pooja Hirwade performs Bharatanatyam on 'Namō Namō Bhāratāmbē' and Chandrayaan Anthem.

      Chandrayaan-3 is all set to successfully land on the moon today around 6.04 pm IST. pic.twitter.com/6Z40gmgbqj

  • चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगसाठी उज्जैनमधील श्री महाकालेश्वर मंदिरात विशेष 'भस्म आरती' करण्यात आली.
    • #WATCH | Madhya Pradesh: Special 'Bhasma Aarti' performed at Shree Mahakaleshwar Temple in Ujjain, for the successful landing of #Chandrayaan3

      According to ISRO, Chandrayaan-3 is all set to land on the Moon on August 23 at around 18:04 hrs IST. pic.twitter.com/TSTq7yoYQe

      — ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • चंद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी न्यू जर्सीच्या मनरो येथील ओम श्री साई बालाजी मंदिर आणि सांस्कृतिक केंद्रात प्रार्थना करण्यात आली. सर्व भारतीय समुदायासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आशा आहे, सर्व काही ठीक होईल. चंद्रयान टीमला शुभेच्छा, असं अनिवासी भारतीयांनी म्हटलय.
    • #WATCH | US: Prayers being offered at Om Sri Sai Balaji Temple and Cultural Center in Monroe, New Jersey for the successful landing of #Chandrayaan3Mission

      Members of the Indian-American community say, "It's a proud moment for all of our Indian community. Hopefully, everything… pic.twitter.com/clSH4HBqv8

  • उत्तर प्रदेशमधील भाजपा नेते मोहसिन रझा यांनी बुधवारी लखनौमधील हजरत शाह मीना शाह दर्ग्यात चंद्रयान 3 च्या यशासाठी प्रार्थना केली.

इस्रो घडवणार इतिहास : चंद्रयान 3 मोहीम इस्रोसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. चंद्रयान 3 या मोहिमेतील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता फक्त त्यांच्या चंद्रावर उतरण्याची प्रतिक्षा तेवढी बाकी आहे. इस्रो आज सायंकाळी 06.04 वाजता इतिहास घडवण्यास सज्ज झालं आहे.

चंद्रयान 3 यशस्वी झाल्यास भारताला मिळणार 'हा' सन्मान : भारताची चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत अंतराळ क्षेत्रात मोठी भरारी घेणार आहे. आतापर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर कोणत्याही देशाला उतरता येणं शक्य झालं नाही. त्यामुळे चंद्रयान 3 यशस्वी झाल्यास भारताची अंतराळात निर्विवाद सत्ता प्रस्थापित होईल, असं मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दक्षिण ध्रूवावर सॉफ्ट लँडींग करणं आव्हानात्मक आहे. मात्र इस्रोनं हे शिवधनुष्य पेललं आहे. चंद्रयान ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत अमेरिका, चीन, रशिया यांच्या यादीत स्थान मिळवणार आहे.

इस्रोनं भूतकाळातून घेतला बोध : भारतानं या अगोदरही चंद्रयान मोहीम केली आहे. मात्र, चंद्रयान 2 मोहिमेत इस्रोला अपयश आलं होतं. त्यामुळे इस्रोनं खचून न जाता भूतकाळातील चुकातून अनेक गोष्टी शिकल्या आहेत. चंद्रयान 2 ही मोहीम करताना लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळल्यानं ही मोहीम अयशस्वी झाली होती. त्यामुळे इस्रोच्या संशोधकांना मोठा धक्का बसला होता. मात्र हा धक्का चंद्रयान 3 मोहिमेची पायरी ठरला. संशोधकांनी या धक्क्यातून सावरत चंद्रयान 3 मध्ये अनेक सुधारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा -

  1. Chandrayaan 3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंगसाठी 'विक्रम'समोर अनेक आव्हानं, जाणून घ्या सविस्तर

Last Updated : Aug 23, 2023, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.