जयपूर: करवा चौथच्या दिवशी (Karwa Chauth 2022) महिला चंद्र उगवण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र यावर्षी ढगाळ वातावरणामुळे भाविकांना चंद्राचे दर्शन घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.(Chandra darshan on Karwa Chauth). उत्तर भारतात काळ्या ढगांमुळे चंद्रदर्शन होणे अवघड आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जयपूरमध्ये करवा चौथला आकाश निरभ्र असेल. असे असले तरी प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यात चंद्रोदयाची वेळ काही ना काही फरकाने मागे-पुढे असते. (Chandra darshan time on Karwa Chauth). येथे आम्ही जयपूरमधील चंद्रोदयाची माहिती देत आहोत.
करवा चौथ 2022 तिथी आणि मुहूर्त:
चतुर्थी तिथी प्रारंभ - 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 01:59 वाजता
चतुर्थी तिथी समाप्त - 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 03:08 पर्यंत
करवा चौथ पूजेसाठी शुभ वेळ - 13 ऑक्टोबर संध्याकाळी 5:54 ते संध्याकाळी 7.09 पर्यंत.
अभिजीत मुहूर्त - करवा चौथच्या दिवशी सकाळी 11.21 ते 12.07 पर्यंत.
चंद्रोदय - रात्री 8:09
करवा चौथ व्रताची वेळ - रात्री 06.20 ते रात्री 08.09 पर्यंत.
जयपूरमध्ये चंद्र उगवण्याची वेळ- जयपूरमध्ये करवा चौथच्या दिवशी हवामान स्वच्छ असेल. येथे चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 08:19 वाजता आहे
चंद्र नाही उगवला तर महिलांनी हे करावे: करवा चौथचे व्रत गुरुवारी 13 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. दिवसभर निर्जला व्रत पाळल्यानंतर सायंकाळी चंद्रदर्शनानंतर पूजा करून व्रताची सांगता होते. काही वेळा बऱ्याच ठिकाणी काही कारणास्तव चंद्र दिसत नाही. अशा परिस्थितीत जर चंद्र दिसला नाही तर महिला खालील उपाय करू शकतात -
- असे म्हणतात की करवा चौथच्या दिवशी चंद्र न दिसल्यास महिला दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर भोजन करू शकतात.
- चंद्राची पूजा करून क्षमा मागूनच व्रत पूर्ण करा.
- चंद्र दिसत नसेल तर चंद्राचे आवाहन करून विधिवत पूजा करा. यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करून व्रत पूर्ण करा.
- चंद्रोदयाच्या वेळी चंद्राच्या दिशेकडे तोंड करून पूजा करा.
- माता लक्ष्मीचे ध्यान करताना पतीची पूजा करून उपवास सोडावा.
- ज्योतिष शास्त्रानुसार गरोदर, वृद्ध आणि आजारी महिलांना चंद्रदर्शन होत नसेल तर चंद्रदर्शनाशिवाय उपवास सोडता येऊ शकतो.
यावर्षी करवा चौथला जुळून येतो आहे शुभ संयोग - यावर्षी करवा चौथला अतिशय शुभ संयोग जुळून येतो आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगासह सिद्धी योग तयार होत आहे. यासोबतच या दिवशी शुक्र आणि बुध यांचा संयोग कन्या राशीत होत असून त्यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. याशिवाय बुध आणि सूर्याच्या संयोगामुळे बुधादित्य योगही तयार होत आहे. अशा शुभ संयोगाच्या दिवशी करवा चौथ ठेवल्याने वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो.