ETV Bharat / bharat

चमोली महाप्रलय : संशोधकांनी आधीच दिला होता इशारा - uttarakhand flash flood

उत्तराखंड अंतराळ उपयोग केंद्रातील(युसॅक) संशोधकांनी यापूर्वीच हिमालयातील 8 ग्लेशिअर वितळत असल्याचा इशारा दिला होता. हे केवळ हिमालयातील डोंगराळ प्रदेशातील नागरिकांसाठीच नव्हे तर देशासाठी धोकादायक असल्याचा इशारा संशोधकांनी यापूर्वीच दिला होता.

चमोली महाप्रलय : संशोधकांनी आधीच दिला होता इशारा

author img

By

Published : Feb 8, 2021, 9:13 AM IST

चमोली : उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या महाभयंकर दुर्घटनेमुळे ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा थेट परिणाम पृथ्वीवरील अतिथंड अशा ग्लेशिअर्सवर होत असून येथील बर्फ वेगाने वितळत आहे. याचाच परिणाम म्हणजे हिमकडा कोसळण्याची ही दुर्घटना असल्याचे संशोधक सांगत आहेत.

युसॅकच्या शास्त्रज्ञांनी दिला होता इशारा

उत्तराखंड अंतराळ उपयोग केंद्रातील(युसॅक) संशोधकांनी यापूर्वीच हिमालयातील 8 ग्लेशिअर वितळत असल्याचा इशारा दिला होता. हे केवळ हिमालयातील डोंगराळ प्रदेशातील नागरिकांसाठीच नव्हे तर देशासाठी धोकादायक असल्याचा इशारा संशोधकांनी यापूर्वीच दिला होता. ग्लोबल वॉर्मिंगमुळे नंदा देवी बायोस्फेअरमध्ये असलेल्या 8 ग्लेशिअरचे क्षेत्रफळ 26 टक्क्यांनी घटल्याचे युसॅकचे संचालक डॉ. एमपीएस बिष्ट यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. हे ग्लेशिअर दरवर्षी 5 ते 30 मीटरने मागे सरकत असल्याचे त्यांनी सांगितले.

वृक्षतोडीचा परिणाम

वेगाने वितळणाऱ्या ग्लेशिअरविषयी पर्यावरण तज्ञ कल्याण सिंह रावत यांनी चिंता व्यक्त केली आहे. उत्तराखंडमधील हिमालयाच्या भागात वेगाने वृक्षतोड होत आहे. त्यामुळेच तापमान वाढून ग्लेशिअर वितळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत आपण येथे पर्यटनावर निर्बंध आणत नाही तोपर्यंत ग्लेशिअरवरील संकट कायम राहील असे त्यांनी म्हटले आहे. तर उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी इको टुरीजमला चालना देण्याची गरज व्यक्त केली आहे.

हेही वाचा - चमोलीतील महाप्रलयंकारी दुर्घटनेत 14 ठार, 170 हून अधिक बेपत्ता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.