नवी दिल्ली : Ethanol Prices Increased: पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत केंद्र सरकारने बुधवारी वाढ केली. याचे कारण असे की सरकार हे मिश्रण दुप्पट करून 20 टक्के करण्याचा विचार करत आहे. CENTRAL GOVERNMENT HIKES ETHANOL PRICES
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) उसाच्या रसातून काढलेल्या इथेनॉलची किंमत डिसेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या पुरवठा वर्षासाठी सध्याच्या ६३.४५ रुपये प्रति लिटरवरून ६५.६० रुपये प्रति लिटर केली आहे.
सी-हेवी मोलॅसेसचे इथेनॉलचे दर सध्या 46.66 रुपये प्रति लिटरवरून 49.40 रुपये प्रति लिटर आणि बी-हेवी मोलॅसेसचे इथेनॉलचे दर 59.08 रुपये प्रति लिटरवरून 60.73 रुपये प्रति लिटर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. इथेनॉलच्या किमती वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही आगामी काळात याचा फायदा होऊ शकतो.