नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या वर्षी 5 जानेवारी रोजी पंजाब दौरा झाला. त्या दौऱ्यात सुरक्षेत काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामध्ये सुरक्षेच्या नियमात झालेल्या उल्लंघनाबाबत केंद्र सरकारने पंजाब सरकारकडून तपशीलवार कारवाईचा अहवाल मागवला आहे. सरकारी सूत्रांनी रविवारी सांगितले की, पंजाब सरकारला गृह मंत्रालयामार्फत (MHA) पत्र पाठवण्यात आले आहे, ज्यात चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तपशीलवार कारवाईचा अहवाल मागवला आहे.
चुकीच्या अधिकार्यांच्या विरोधात कारवाई : केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पंजाबचे मुख्य सचिव विजय कुमार जंजुआ यांना पंजाब सरकारने चुकीच्या अधिकार्यांच्या विरोधात कारवाई करण्यात दिरंगाई अधोरेखित करणारा कृती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवाल लवकरात लवकर शेअर करण्याचे संकेत देणारे पत्र या महिन्याच्या सुरुवातीला पाठवण्यात आले होते. त्यावर आता केंद्र स्थारावर तपासले जाणार असून, त्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. तसेच, यामध्ये त्रुटी आढळल्या तेव्हा पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे याला वेगळे वळण दिले गेले असही बोलले गेले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना या चुकांसाठी जबाबदार धरण्यात आले : (5 जानेवारी 2022)रोजी पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षा भंगाची चौकशी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल सहा महिन्यांपूर्वी सादर करण्यात आला होता. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी, पोलीस प्रमुख एस चट्टोपाध्याय आणि इतरांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना या चुकांसाठी जबाबदार धरण्यात आले आहे.
5 जानेवारी रोजी पंजाबमधील फिरोजपूर दौरा झाला होता : सुरक्षा भंग झाल्यानंतर लगेचच, एमएचएने तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती, ज्याने पंजाब पोलीस महासंचालक, सिद्धार्थ चट्टोपाध्याय, पंजाबचे एडीजीपी, पटियालाचे आयजीपी आणि फिरोजपूरचे डीआयजी यांच्यासह पंजाब पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांना बोलावले होते. 5 जानेवारी रोजी पंजाबमधील फिरोजपूर दौऱ्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यानंतर एमएचएने पंजाब सरकारला 'या चुकांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यास' सांगितले.
हेही वाचा : Pollution in Mumbai: मुंबईत प्रदूषण करणाऱ्यांवर १ एप्रिलपासून कारवाई, जी २० साठी पुन्हा सुशोभीकरण