नई दिल्ली: श्रद्धा हत्याकांडात पोलिसांना मोठा यश मिळाले आहे. आरोपी आफताब अमीन पूनावाला आज सोमवार (दि. 26 जानेवारी)रोजी त्याच्या आवाजाचे नमुने रेकॉर्ड करण्यात आले. केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत त्याला दाखल करण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांना श्रद्धा आणि आफताब पूनावाला यांच्यातील कथित वादाची ऑडिओ क्लिप मिळाली असून त्यानंतर आफताबच्या आवाजाचे नमुने रेकॉर्ड केले आहेत. (Shraddha murder case) अफतापला त्याच्या आवाजाचे नमुने रेकॉर्ड करण्यासाठी (CFSL)मध्ये नेण्यात आले होते.
अनेक घडामोडींचा शोध - पॉलिग्राफ चाचणी आणि नार्को चाचणी पूर्ण झाल्यानंतर दिल्ली पोलीस श्रद्धा हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताबच्या आवाजाचे नमुने गोळा करत आहेत. दिल्ली पोलिसांनी आफताबचे व्हॉट्सअॅप संदेश आणि व्हॉईस रेकॉर्डिंग मिळवले आहे, त्यानंतर ते आता सीएफएसएल लॅबमध्ये त्याच्या आवाजाच्या नमुन्यांशी जुळले जातील की नाही हे पाहत आहेत. आवाजाच्या नमुन्याशी मिळालेल्या रेकॉर्डिंगची जुळवाजुळव केल्यानंतर श्रद्धा खून प्रकरणाशी संबंधित अनेक घडामोडींचा शोध घेता येईल, अशी आशा पोलिसांना आहे.
आवाजाच्या नमुन्याची तपासणी - 23 डिसेंबर रोजी दिल्लीतील साकेत न्यायालयात सुनावणी झाली. आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने आफताबच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबचे व्हॉट्सअॅप चॅट आणि कॉल डिटेल्स काढले आहेत, त्यानंतर पोलीस आता आवाजाच्या नमुन्याची तपासणी करणार आहेत.
आफताब आणि श्रद्धा एका डेटिंग वेबसाइटवर भेटले - या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धाचे वडिल विकास वॉकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १० नोव्हेंबरला एफआयआर नोंदवला. तेव्हा ही बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी आफताब पूनावाला याला अटक केली आहे. आफताब आणि श्रद्धा एका डेटिंग वेबसाइटवर भेटले आणि त्यानंतर दोघेही दिल्लीतील छतरपूर येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते.