इस्लामाबाद पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर शनिवारी इस्लामाबादच्या रॅलीत पोलीस, न्यायव्यवस्था आणि इतर सरकारी संस्थांना धमकावल्याबद्दल दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा Case Registered Against Imran Khan दाखल करण्यात आला. या संदर्भातील माहिती रविवारी उजेडात आली. यापूर्वी पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी रविवारी सांगितले की, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर राज्य संस्थांना धमकावणे आणि रॅलीत प्रक्षोभक विधाने केल्याप्रकरणी सरकार गुन्हा नोंदविण्याचा विचार करत आहे.
इस्लामाबादमधील मरगल्ला पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री १० वाजता खानविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात म्हटले आहे की, खान यांच्या भाषणामुळे पोलिस, न्यायाधीश आणि देशात भीती आणि अनिश्चितता निर्माण झाली. शनिवारी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना इम्रान खान यांनी उच्च पोलीस अधिकारी, एक महिला दंडाधिकारी, पाकिस्तान निवडणूक आयोग आणि राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली होती.
गेल्या आठवड्यात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला आपला सहकारी शाहबाज गिल यांच्याशी झालेल्या वागणुकीवरून त्याने हा इशारा दिला होता. सनाउल्लाह यांनी आरोप केला आहे की, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान आपल्या भाषणांमध्ये लष्कर आणि इतर संस्थांना लक्ष्य करत आहेत आणि त्यांनी आपला प्रचार सुरू ठेवला आहे. ते म्हणाले की, गृह मंत्रालयाने खान यांच्या नवीन भाषणाचा अहवाल तयार केला आहे आणि पुढील काही दिवसांत या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी महाधिवक्ता आणि कायदा मंत्रालयाशी सल्लामसलत करत आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानातील मीडिया वॉचडॉगने माजी पंतप्रधान खान यांच्या भाषणांचे थेट प्रक्षेपण सर्व उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्यांवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली होती.
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटी ने शनिवारी एका प्रकाशनात म्हटले आहे की, वारंवार इशारा देऊनही सरकारी आस्थापनांविरुद्ध प्रसारण थांबविण्यात दूरचित्रवाणी वाहिन्या अयशस्वी ठरल्या आहेत. असे आढळून आले आहे की, पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान त्यांच्या भाषणांमध्ये सरकारी आस्थापनांवर सतत बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि प्रक्षोभक विधानांद्वारे द्वेषयुक्त प्रचार करत आहेत. ज्यामुळे कायदा सुव्यवस्था राखणे कठीण होऊ शकते.
पाकिस्तान तेहरीक ए इन्साफच्या अध्यक्षांवर लादलेल्या निर्बंधांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना पक्षाने म्हटले आहे की, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार फॅसिस्ट सरकार आहे. दरम्यान, खान यांनी रविवारी रात्री रावळपिंडीतील लियाकत बाग मैदानावर एका सभेला संबोधित केले. पेमरावरील भाषणांच्या प्रसारणावर बंदी घालण्याबाबत खान म्हणाले, आता पेमराही या खेळात सामील झाला आहे. इम्रान खानने काय केले माझा गुन्हा एवढाच आहे की मी हे आयात केलेले सरकार स्वीकारत नाही.
हेही वाचा VIDEO : पाहा, तालिबानविषयी प्रश्न विचारताच कसे पळाले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान