हैदराबाद - हैदराबाद मध्ये आज कार रेसिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (car racing to held in Hyderabad). शहरातील प्रसिद्ध हुसेनसागर तलावाच्या किनारी ही रेस होणार आहे. (car racing to held on banks of Husensagar lake). 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या फॉर्म्युला ई कार शर्यतीच्या तयारीचा भाग म्हणून इंडियन रेसिंग लीग (Indian Racing League) या रेसचे आयोजित करत आहे.
50 टक्के परदेशी रेसर सहभागी - पेट्रोल कारसह होणारी ही रेसिंग दुपारी 4 वाजता सुरू होईल आणि 4:45 वाजता संपेल. या रेस मध्ये 12 कार आणि 6 टीम सहभागी होणार आहेत. रेसमध्ये 50 टक्के परदेशी रेसर सहभागी होणार आहेत. या रेसिंगद्वारे ट्रॅकची ताकद तपासली जाईल. इंडियन रेसिंग लीग पाहण्यासाठी सुमारे 7,500 लोकांची गॅलरी उभारण्यात आली आहे. हैदराबाद ग्रोथ कॉरिडॉरचे एमडी संतोष यांनी खुलासा केला की इंडियन रेसिंग लीगसाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत.