ETV Bharat / bharat

'अभिनेता विजयकांत गेला यावर विश्वास बसत नाही'; 9 वीतील मित्रानं जागवल्या 'कॅप्टन'च्या आठवणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 8:07 AM IST

Updated : Dec 29, 2023, 9:06 AM IST

Captain Vijayakanth Passed Away : अभिनेता तथा डीएमडीकेचे नेते विजयकांत यांचं गुरुवारी सकाळी चेन्नईतील रुग्णालयात निधन झालं. त्यांच्यावर आज दुपारी 4.45 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानं त्यांच्या मित्राला धक्का बसला आहे.

Captain Vijayakanth Passed Away
अभिनेते विजयकांत आणि बालसुब्रमण्यम

चेन्नई Captain Vijayakanth Passed Away : अभिनेते आणि डीएडीकेचे नेते कॅप्टन विजयकांत यांचं गुरुवारी सकाळी चेन्नईतील रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनानं त्यांच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला. विजयकांत यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4.45 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजयकांत हे चित्रपटसृष्टीत राजकारणात जसे अभिनेता आणि नेता म्हणून लोकप्रिय होते, तसंच ते त्यांच्या मित्र परिवारातही सगळ्यांचे लाडके होते. त्यामुळं त्यांच्या मित्रांना त्यांच्या निधनानं मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या 9 वीतील मित्रानं विजयकांत यांचं निधन झालं, यावर विश्वास बसत नसल्याचं ईटीव्ही भारतकडं स्पष्ट केलं आहे.

Captain Vijayakanth Passed Away
अभिनेता तथा डीएमडीकेचे नेते विजयकांत

विजयकांत यांच्या निधनाचा मित्राला धक्का : अभिनेते तथा डीएमडीकेचे नेते विजयकांत यांच्यासोबत 9 वीच्या वर्गात शिकणारे बालसुब्रमण्यम यांनी विजयकांत यांच्या आठवणी जागवल्या. गुरुवारी सकाळी विजयकांत यांचं निधन झाल्याचं कळताच त्यांच्या मित्रांना मोठा धक्का बसला. बालसुब्रमण्यम यांनी विजयकांत यांचं निधन झालं यावर विश्वासबसत नसल्याचं सांगितलं. बालसुब्रमण्यम हे कोईम्बतूर जिल्ह्यातील पोल्लाचीजवळील नवमलाई इथं विद्युत मंडळाचे सहायक अभियंता म्हणून कार्यरत होते. बालसुब्रमण्यम आणि विजयकांत हे दोघांनी अंबासमुद्रम तालुक्याच्या विक्रमसिंगपुरम इथल्या सेंट मेरी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतलं. हे दोघंही 9 वीतील बी वर्गात सोबत शिकत होते.

पुन्थोटा कावलकरण चित्रपटाच्या शूटींगच्या वेळी घेतली भेट : बालसुब्रमण्यम काम करत असलेल्या ठिकाणी विजयकांत यांच्या पुन्थोटा कावलकरण चित्रपटाचं शूटींग होतं. तिथंच बालसुब्रमण्यम असल्यानं त्यांनी विजयकांत यांची भेट घेतली. आपण एकाच शाळेत शिकत असल्याचं त्यांनी विजयकांत यांना सांगितलं. त्यावेळी दोघांनी शालेय जीवनातील आठवणी जागवल्या.

अभ्यास चांगला नसल्यानं विजयकांतला ठेवलं होतं वसतिगृहात : "विजयकांत यांचा अभ्यास चांगला नसल्यामुळं त्यांना वसतिगृहात ठेवण्यात आलं होतं. 1966 च्या त्याकाळी फक्त श्रीमंत लोकच वसतिगृहात जाऊन शिक्षण घेऊ शकत होते. गरीब लोक वसतिगृहात राहू शकत नाहीत, असं ते म्हणाले. तिथं विजयकांत हे अभ्यासात हुशार नसल्यानं त्यांना इथल्या वसतिगृहात राहून शिकायला लावलं. 1966-1967 मध्ये विजयकांत आणि मी 9 वी ब वर्गात एकत्र होतो. 1967-1968 मध्ये आम्ही एकाच बाकावर एकत्र बसलो. 1968 नंतर विजयकांत यांनी आमची शाळा सोडली. मात्र त्यानंतर विजयकांतनं चांगला अभ्यास केला. तमिळ चित्रपट उद्योग आणि राजकारणातील विजयकांतची कामगिरी ही अभिमानास्पद आहे. मात्र त्याचा मृत्यू झाला हे सहन होत नाही," असं बालसुब्रमण्यम यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं.

पोल्लाचीला आल्यावर होत होती भेट : "चिन्ना गौंडर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही भेटलो तेव्हा 'तुम्ही मला चांगलं ओळखणारे एकमेव व्यक्ती आहात, असं म्हणत त्यांनी माझं कौतुक केलं. त्यांचं नाव विजयराज होतं, मात्र दिग्दर्शक एम ए खाजा यांनी ते बदलून विजयकांत केलं. जेव्हा जेव्हा विजयकांत पोल्लाचीला येत होते, तेव्हा मी त्याला प्रत्यक्ष भेटतो. विजयकांतसारखा चांगला माणूस आता दिसत नाही. त्यांच्या आठवणी कधीच विसरता येणार नाहीत. विजयकांत्या निधनाची बातमी कळल्यापासून मला रडू येत आहे. त्याच्यासारखा मित्र गमावणं हा माझ्यासाठी मोठा धक्का आहे."

आज होणार अंत्यसंस्कार : डीएमडीकेचे नेते तथा अभिनेते विजयकांत यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4.45 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचं पार्थिव आज अण्णा सलाईतील थिऊ थिडल इथं सकाळी 6 ते दुपारी 1 वाजतापर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता थिऊ थिडल इथून त्यांची अंत्ययात्रा निघून पूनमल्ली मार्गे डीएमडीकेच्या मुख्य कार्यालयात पोहोचून दुपारी 4.45 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

  1. डीएमडीकेचा कॅप्टन हरपला; अभिनेता विजयकांतनं घेतला अखेरचा श्वास

Last Updated : Dec 29, 2023, 9:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.