ETV Bharat / bharat

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ; केंद्राच्या तिजोरीवर 9488.75 कोटींचा पडणार बोझा

केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलै 2021 पासून वाढ होणार आहे. त्याचा फायदा पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही होणार आहे.

महागाई भत्ता वाढ
महागाई भत्ता वाढ
author img

By

Published : Oct 21, 2021, 4:58 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. अनुराग ठाकूर म्हणाले, की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलै 2021 पासून वाढ होणार आहे. त्याचा फायदा पेन्शन घेणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 28 टक्क्यांवरून 31 टक्के करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की महागाई भत्त्यातील वाढीचा केंद्र सरकारच्या 47.14 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. तर पेन्शन घेणाऱ्या 68.72 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

हेही वाचा-पेट्रोलसह डिझेलच्या दरात पुन्हा 35 पैशांनी वाढ; श्रीनगर ते चेन्नई संपूर्ण देशात इंधनाने गाठली शंभरी

महागाई भत्त्यात वाढ केल्याने केंद्र सरकारच्या तिजोरीवर 9488.75 कोटींचा बोझा पडणार आहे. चालू वर्षात जुलैमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता हा 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा-VIDEO : पंतप्रधान मोदींनी मणिपुरी नर्सचे केले कौतुक, भारताने पार केला 100 कोटी लसीकरणाचा टप्पा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.