ETV Bharat / bharat

Abbas Ansari Illegal House : आमदार अब्बास अन्सारीच्या बेकायदेशीर घरावर योगींचा बुलडोझर! - अब्बास अन्सारी बेकायदेशीर घर

मऊ येथील माफिया मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारी याच्या बेकायदा घरावर बुलडोझर चालवला जात आहे. शुक्रवारीही ही कारवाई करण्यात आली होती. मशिनमध्ये बिघाड झाल्याने रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होऊ शकले नव्हते.

Abbas Ansari Illegal House
अब्बास अन्सारी याच्या बेकायदा घरावर बुलडोझर चालवला
author img

By

Published : Mar 4, 2023, 2:33 PM IST

मऊ (उ. प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील जहांगीराबादमध्ये माफिया मुख्तार अन्सारी, त्याचा आमदार पुत्र अब्बास अन्सारी आणि त्याचा लहान मुलगा उमर अन्सारी यांच्या अवैध घरावर शनिवारी बुलडोझर चालवला गेला. जिल्हा प्रशासनाने शुक्रवारपासूनच पाडकामाला सुरुवात केली होती. यंत्रातील बिघाडामुळे रात्री उशिरा काम अपूर्ण राहिले. त्यामुळे शनिवारी नवीन मशीन मागवून घर पाडले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी आदेशा दिल्यानंतर ही कारवाई केली जात आहे.

शक्तिशाली मशिन्स मागवल्या : शहर दंडाधिकारी नितीश कुमार सिंह यांनी सांगितले की, संपूर्ण घर अद्याप जमीनदोस्त झालेले नाही. त्यामुळे जेसीबीच्या आणखी काही शक्तिशाली मशिन्स घटनास्थळी बोलवण्यात आल्या आहेत. घर पाडण्याचे काम सुरू झाले आहे. मुख्तार अन्सारी याने ही जमीन त्यांच्या आई रजिया बेगम यांच्या नावावर खरेदी केली होती. मुख्तार अन्सारी हयात असताना आईने वारसाहक्काने ते मुख्तार अन्सारीच्या दोन्ही मुलांच्या नावे केले होते. या जमिनीवर दुमजली घर आणि कार्यालय बांधण्यात आले. ते अब्बास अन्सारी आणि त्याचा मुलगा चालवत होता. नकाशा मंजूर न करताच या जमिनीवर बेकायदेशीरपणे इमारत उभारण्यात आली.

घराची किंमत सुमारे 80 लाख रुपये : या प्रकरणाच्या चौकशीत प्रशासनाने आमदार अब्बास अन्सारी यांना नोटीस दिली होती. ही इमारत बेकायदा ठरवून नगर दंडाधिकारी न्यायालयाने ती पाडण्याचे आदेश दिले होते. यानंतर मुख्तार अन्सारीच्या दोन्ही मुलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. शहर दंडाधिकारी नितीश कुमार सिंह यांनी सांगितले की, हे घर अतिशय मजबूत असून ते पाडण्यात आम्हाला अडचण आली. रात्री उशिरा काही मशिन्स मध्ये बिघाड झाला होता. यानंतर आणखी काही शक्तिशाली मशीन आणण्यात आल्या आहेत. आज पाडकामाचे काम पूर्ण होणार आहे. मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्तासह पीएसी कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. नगर दंडाधिकारी व सीओ सिटी यांच्या नेतृत्वाखाली घर जमीनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. या घराची किंमत अंदाजे 80 लाख रुपये एवढी आहे.

हेही वाचा : Umesh Pal Murder Case : उमेश पाल हत्याकांडातील आरोपीच्या भावाची भाजपमधून हकालपट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.