कांकेर (छत्तीसगड) BSF Jawan Suicide : छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे नक्षल आघाडीवर तैनात असलेल्या एका बीएसएफ जवानानं स्वत:च्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस आणि बीएसएफचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण : या प्रकरणी अतिरिक्त एसपी खोमन सिन्हा यांनी अधिक माहिती दिली. 'बीएसएफ कॉर्प्सचे शिपाई वाल्मिकी सिन्हा २८ ऑक्टोबर रोजी फ्रंट ड्युटीवर तैनात होते. अचानक बॅरेकमधून गोळीबाराचा मोठा आवाज आला. त्यानंतर त्यांचे सहकारी सैनिक घटनास्थळी धावले, तेव्हा त्यांना वाल्मिकी सिन्हा जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळले. त्यांच्या सहकाऱ्यांना काही समजण्यापूर्वीच सिन्हा यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे', असं त्यांनी सांगितलं.
जवान कॅम्पमध्ये ड्युटीवर होता. ड्युटीवर असताना त्यानं स्वत:वर गोळी झाडली. बीएसएफ आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. - खोमन सिन्हा, एएसपी, कांकेर
जवानानं आत्महत्या करण्याची पहिली घटना नाही : नक्षल आघाडीवर तैनात असलेल्या जवानानं आत्महत्या करण्याची ही काही पहिलीच घटना नाही. या आधीही अनेक जवानांनी असं आत्मघातकी पाऊल उचललं आहे. या आधी कांकेरच्या हलबा चौकीत मोर्चावर तैनात असलेल्या बीसीएफ जवानानं स्वत:वर गोळी झाडली होती. कांकेर पोलिसांनी या आत्महत्येचा खुलासा केला होता. मैत्रिणीनं ब्लॅकमेल केल्यामुळं या जवानानं आत्महत्या केली होती.
हेही वाचा :