ETV Bharat / bharat

बीएसएफने अमृतसरच्या भारत पाकिस्तान सीमेवरून संशयास्पद तरुणाला केली अटक - BSF ARRESTS SUSPICIOUS YOUTH

पंजाबमध्ये अमृतसरजवळ सारंगदेव या सीमावर्ती गावाशेजारी एक युवक दुरियन गावात फिरत होता. या तरुणाकडून एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याची बीएसएफ जवानांनी तपासणी केली असता, तो पाकिस्तानमधील एका व्यक्तीने तयार केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधील अॅडमिन असल्याचे आढळून आले.

बीएसएफने अमृतसरच्या भारत पाकिस्तान सीमेवरून संशयास्पद तरुणाला केली अटक

author img

By

Published : Sep 2, 2022, 12:24 PM IST

अमृतसर - भारत-पाकिस्तान सीमेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सारंगदेव गावाजवळ रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या एका संशयित भारतीय तरुणाला बीएसएफच्या 183 बटालियनने पकडले. त्याला अजनाळा पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सारंगदेव या सीमावर्ती गावाजवळ एक युवक दुरियन गावात फिरत होता. या तरुणाकडून एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याची बीएसएफ जवानांनी तपासणी केली असता, तो पाकिस्तानमधील एका व्यक्तीने तयार केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधील अॅडमिन असल्याचे आढळून आले.

संबंधित व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्वाधिक संख्या पाकिस्तानातील लोकांची आहे. या तरुणाने त्या व्हाट्सअप ग्रमुपमध्ये कबुतरांबाबत चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. याअनुषंगानेही बीएसएफचे अधिकारी तसेच इतर सुरक्षा यंत्रणांनी या तरुणाची कसून चौकशी केली.

हेही वाचा - Murugha math seer अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणी मुरुगा मठाधिपतीला अटक, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.