ETV Bharat / bharat

Rohtak Bride Shot by boyfriend : प्रियकराने नवरी लग्नानंतर सासरी जात असताना झाडली गोळी - नवरी लग्नानंतर सासरी जात असताना झाडली गोळी

सांपला गावात राहणाऱ्या तरूणीचं लग्न भाली आनंदपूर गावात राहणाऱ्या तरूणासोबत झाले होते. लग्न झाल्यानंतर नवरीला घरी घेऊन जात असताना काही लोकांनी नवरीच्या कार ओव्हरटेक करून थांबवले. नवरदेवाला बाहेर काढले आणि मग नवरीच्या मानेवर गोळी झाडली. ( Rohtak Bride Shot )

Rohtak Bride Shot
नवरी लग्नानंतर सासरी जात असताना तिच्यावर गोळी
author img

By

Published : Dec 2, 2021, 1:43 PM IST

Updated : Dec 2, 2021, 3:45 PM IST

रोहतक (हरयाणा) - हरयाणातील रोहतकमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक नवरी लग्नानंतर सासरी जात असताना रस्त्यात तिच्यावर गोळी झाडण्यात आली. ( Rohtak Bride Shot ) ही गोळी तिच्या पुर्वीच्या प्रियकराने झाडली असल्याचे नागरिकांने सांगितले आहे. मात्र याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

नवरीच्या मानेवर झाडली गोळी -

सांपला गावात राहणाऱ्या तरूणीचं लग्न भाली आनंदपूर गावात राहणाऱ्या तरूणासोबत झाले होते. लग्न झाल्यानंतर नवरीला घरी घेऊन जात असताना काही लोकांनी नवरीच्या कार ओव्हरटेक करून थांबवले. नवरदेवाला बाहेर काढलं आणि मग नवरीच्या मानेवर गोळी झाडली. यात नवरी गंभीर जखमी झाली. दरम्यान, हल्लेखोरांना नवरदेवाच्या भावाची सोन्याची चेनही घेतली आणि फरार झाले. जखमी नवरीला पीजीआय रोहतकच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तिची स्थिती गंभीर असून पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.

गावात भीतीचे वातावरण -

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, सांपला गावात राहणाऱ्या तरूणीचे लग्न भाली आनंदपूर गावात राहणाऱ्या तरूणासोबत झाले होते. शुक्रवारी नवरी लग्न करून आपल्या सासरी जात होती. कार नवरदेवाचा भाऊ सुनील चालवत होता. रात्री साधारण १२ वाजता गावातील शिव मंदिराजवळ पोहोचताच मागून इनोव्हा कारमधून तीन लोक आले. त्यांनी नवरीची कार थांबवली आणि नवरीवर गोळी झाडली. नवरी रक्ताच्या थारोळ्यात कारमध्येच पडली. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. असे सांगितले जात आहे की, हे कृत्य नवरीचा पूर्वीचा प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. चौकशी दरम्यान पोलिसांनी असेही समजलं की, हल्लेखोर सांपलापासूनच नवरीच्या कारचा पाठलाग करत होते. नवरी जशी आपल्या सासरच्या गावाबाहेर पोहोचली त्यांनी तिच्यावर गोळी झाडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा - CCTV : दिवसाढवळ्या कारची काच फोडून पाच लाखांची रोकड लंपास

Last Updated : Dec 2, 2021, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.