नवी दिल्ली - चीनबरोबर असलेल्या सीमावादाचा विषय हा संसदेच्या मान्सून अधिवेशनात दोन्ही सभागृहात चर्चेला येणार आहे. चीनबरोबरील सीमेबाबत काय स्थिती आहे, याबाबतच्या अहवालाची विरोधी पक्षाकडून सरकारकडे मागणी केली जाणार आहे.
संसदेचे अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार आहे. तर 13 ऑगस्टला संसदेचे अधिवेशन संपणार आहे. यावेळी अधिवेशनात देशाच्या संरक्षणाबाबतचे महत्त्वाचे मुद्दे विरोधी पक्षांकडून उपस्थित केले जाणार आहेत.
हेही वाचा-व्हॉट्सअपचा दणका! एकाच महिन्यात बंद केली 20 लाख भारतीयांची अकाउंट
- शरद पवार आणि ए. के. अँटोनी या दोन माजी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे. यावेळी सैन्यदलाचे प्रमुख मनोज नरवणे आणि डिफेन्स स्टाफचे चीफ जनरल बिपीन रावत हे देखील उपस्थित होते.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांना 86 व्या वाढदिवसानिमित्त दलाई लामा यांचे 6 जुलैला अभिनंदन केले होते. तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा केला जात असताना डेमचोकमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर चिनी नागरिकांनी बॅनर लावले होते. त्यावेळी चीनचे सैनिक आणि नागरिक लडाखच्या भागातील डेमचोक येथील सिंधू नदीजवळ आले होते. त्यांनी दलाई लामांचा वाढदिवस होत असताना निषेध व्यक्त केला होता.
- पूर्व लडाखमध्ये भारत व चीनचे सैनिक हे गतवर्षी समोरासमोर उभे ठाकले होते. यावेळी भारताने बचाचात्वमक धोरण स्वीकारले नाही. भारताने पूर्व लडाखमध्ये 50 हजार सैनिकांच्या तुकड्या हलविल्या आहेत.
- संसदेच्या अधिवेशनापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठक घेतली. या बैठकीत चीनबरोबरील सीमावादाचा विषय उपस्थित करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
- संसदीय समितीच्या बैठकीत देशाच्या संरक्षणा संदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी संसदीय समितीच्या चेअरमनने मान्य केली नाही. त्यावर राहुल गांधी हे बैठकीतून बाहेर पडले. संसदीय समितीने अत्यंत महत्त्वाच्या आणि संबंधित मुदद्यावर जाणीवपूर्वक चर्चा करावी, असा राहुल गांधी यांनी संसदीय समितीच्या बैठकीत आग्रह धरला. यामध्ये पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर असलेली स्थिती आणि पाकिस्तानकडून असलेला दहशतवाद्याचा धोका अशा मुद्द्यांचा समावेश होता.
हेही वाचा-उत्तर प्रदेश: मणप्पुरम गोल्ड लोनमध्ये दरोडा: 20 मिनिटात 17 किलो सोने लंपास