ETV Bharat / bharat

Bonalu Festival : महाकालीला समप्रित 'बोनालू' उत्साहात साजरा, पाहूया या सणाची वैशिष्ठे - Badminton player PV Sindhu

तेलंगणासह देशभरात अनेक भागात बोनालू हा सण उत्साहात साजरा झाला. आषाढ महिन्यात हा सण साजरा केला जातो. महिनाभर चालणारा हा उत्सव 30 जून रोजी सुरू झालेल्या या उत्सवाची आज सांगता झाली. हा एक पारंपारिक हिंदू सण आहे. जो देवी महाकाली किंवा यल्लम्मा यांना समर्पित आहे. उत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी देवीची विशेष पूजा (Special Puja to Yellamma Devi ) केली जाते.

Bonalu festival
देवी महाकाली बोनुलु हा एक हिंदू सण
author img

By

Published : Jul 24, 2022, 5:28 PM IST

हैदराबाद - बोनालू किंवा देवी महाकाली बोनुलु हा एक हिंदू सण आहे. ज्यामध्ये देवी महाकालीची पूजा केली जाते. 'बोनालू' हा सण ( Hyderabad Bonalu festival ) प्रामुख्याने तेलंगणा राज्यातील जुळ्या शहरे, हैदराबाद आणि सिकंदराबाद आणि त्याच्या लगतच्या भागात दरवर्षी 'आषाढ' म्हणजे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो. तेलंगणा व्यतिरिक्त, भारताच्या इतर अनेक भागांमध्ये देखील हा उत्सवात साजरा होतो. हा द्रविड संस्कृतीचा एक पारंपारिक हिंदू सण आहे, जो देवी महाकाली किंवा यल्लम्मा यांना समर्पित आहे. उत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी येल्लम्मा देवीची विशेष पूजा केली जाते. यामध्ये रोगांपासून रक्षण करून, सुख-समृद्धी मिळावी अशी देवीला प्रार्थना केली जाते. यावेळी चांगले पीक, समृद्धी आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षणासाठीही प्रार्थना केली जाते.

अशी सुरू झाली प्रथा - लोकांचा असा विश्वास आहे की महाकालीच्या कोपामुळे महामारी उद्भवली आणि तीला शांत करण्यासाठी बोनालू उत्सव सुरू झाला. असे मानले जाते की, 1813 मध्ये हैदराबाद आणि सिकंदराबाद या दोन मोठ्या शहरांमध्ये कॉलरा हा संसर्गजन्य रोग वेगाने पसरला. ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. हा आजार टाळण्यासाठी शहरातील सैन्याने मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील महाकालीच्या मंदिरात पूजा केली. या रोगाचा त्रास टळला तर शहरात माँ काली मूर्तीची प्रतिष्ठापना करू, अशी प्रतिज्ञा केला होती. तेव्हा पूजेनंतर शहरातून कॉलराचा संसर्ग हळूहळू कमी होत गेला, त्यानंतर लष्कराच्या जवानांनी येथे माँ काली मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो.

मिरवणुकीपूर्वी 'रंगण' ही धार्मिक प्रक्रिया केली जाते - महाकालीच्या विशेष पूजेत मोठी मिरवणूक काढली जाते. यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. मिरवणुकीदरम्यान, स्त्रिया मातीच्या भांड्यात डोक्यावर तांदूळ, दूध आणि गुळाचा नैवेद्य घेऊन मंदिरात जातात आणि भक्त त्यांच्या मागे लागतात. या उत्सवात महिला आणि पुरुष पारंपरिक पोशाख परिधान करतात. या उत्सवात महाकाली देवीला प्रसन्न करण्यासाठी प्राण्यांचा बळीही दिला जातो. यानंतर कुटुंबातील सदस्य मिळून हा प्रसाद खातात. बोनालू उत्सवादरम्यान एक विशेष धार्मिक प्रक्रिया पाळली जाते जी 'रंगण' म्हणून ओळखली जाते. यामध्ये एक महिला मातीच्या एका मोठ्या भांड्यावर उभी आसते.असे मानले जाते की त्या स्त्रीमध्ये महाकाली आली आहे, जी लोकांना तिचे भविष्य सांगते. मिरवणुकीपूर्वी ही धार्मिक प्रक्रिया केली जाते. ही मिरवणूक हैदराबादच्या गोलकोंडा येथील श्री जगदंबिका मंदिरापासून सुरू होऊन सिकंदराबाद येथील उज्जयिनी महाकाली मंदिरात आणि नंतर लाल दरवाजा माता मंदिरात संपते.

'बोनम' तयार करून माँ कालीला हे अर्पण - बोनालू सणाच्या वेळी, स्त्रिया 'बोनम' ( Bonum )तयार करतात, ज्याचा तेलगू भाषेतील अर्थ 'मातेला अर्पण करणे' असा आहे.यात मातीच्या भांड्यात दूध, तांदूळ आणि गूळ मिसळून भांड्यावर कडुलिंबाची पाने, हळद, सिंदूर, साडी आणि बांगड्या अर्पण करून त्यावर दिवा लावला जातो. स्त्रिया हे भांडे डोक्यावर ठेवून मंदिरात जातात आणि माँ कालीला हे अर्पण करतात. बोनम सोबत, सिंदूर, बांगड्या, हळद आणि साडी सारख्या इतर वस्तू देखील माँ कालीला अर्पण केल्या जातात.

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने या महोत्सवात सहभाग घेतला - मायासंमा, पोचम्मा, येल्लम्मा, पेदम्मा, अंकलम्मा, मरेम्मा इत्यादी आईच्या विविध प्रादेशिक रूपांचीही या उत्सवात पूजा केली जाते. तर भाग्यनगरममध्ये लालदरवाजा सिंहवाहिनी अम्मावरी बोनालू ( Laldarwaja Singha Vahini Ammavari Bonalu) उत्सव साजरा केला जात आहे. देवेंदर गौड यांच्या मुलाने व सुनेने देवीला पहिला प्रसाद अर्पण केला. तसेच बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने ( Badminton player PV Sindhu ) या महोत्सवात सहभाग घेतला.

हेही वाचा :Rajinikanth : अभिनेता रजनीकांतचा आयकर विभागाकडून गौरव.. तामिळनाडूत भरला सर्वाधिक कर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.