ETV Bharat / bharat

Accident : भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू - bolero and trailer collision

जयपूर-जोधपूर रोडवर रात्री भीषण अपघात झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमींपैकी एकाचा आज सकाळी मृत्यू झाला. सध्या एका जखमीवर उपचार सुरू आहेत.

accident
accident
author img

By

Published : Jul 5, 2021, 8:26 AM IST

जोधपूर - डांगियावास पोलीस स्थानकाअंतर्गत जयपूर महामार्गावर रविवारी (4 जुलै) रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर यातील एका 1 जखमीचा सोमवारी (5 जुलै) सकाळी मृत्यू झाला आहे.

डांगियावास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री अडिचच्या सुमारास जयपूर-जोधपूर रोडवर झाला. एका शैक्षणिक संस्थेजवळ ब्यावरकडे जाणारी बोलेरो ट्रेलरमध्ये घुसली. या दुर्घटनेवेळी रस्त्याचे काम सुरू होते. त्यामुळे वाहतूक एकाच मार्गाने सुरू होती. यावेळी रात्री वेगवान बोलेरो ओव्हरटेक करताना ट्रेलरवर जाऊन आदळली.

अपघात इतका भयानक, की...

हा अपघात इतका भीषण होता की मृतदेह बाहेर काढताना खूप प्रयत्न करावे लागले. शिवाय, दोन जणांचे मृतदेह हातपाय कापून काढण्यात आले. रुग्णवाहिका उशिरा आल्यामुळे जखमींनाही वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. अशा परिस्थितीत जखमींना खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले. बोलेरोमध्ये एकूण 7 लोक होते. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 4 गंभीर जखमींना पोलिसांनी एमडीएम रुग्णालयात नेले. रुग्णालयात रात्री उपचारादरम्यान दोन जखमींचा मृत्यू झाला. तर सोमवारी सकाळी जखमीतील एकाचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्यावर पोलीस स्थानक परिसरातील लोंधारी माळगाव येथील 7 रहिवासी बोलेरोमध्ये जात होते. त्यापैकी सुमेरसिंग (२१), रावतराम (२०), मनोहर (२१), जितेंद्र उर्फ ​​चिकू (२१), चंदन सिंह (२२), राजेश (२२) आणि सिकंदर सिंग यांचा समावेश आहे. यापैकी डीसीपी भुवन भूषण यादव यांनी अपघातात 6 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. दरम्यान, एका जखमीवर सध्या उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - Murder : पाटस हादरले, दोघांची दगडाने ठेचून हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.