ETV Bharat / bharat

ग्वाल्हेरमध्ये 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या, सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरू

ग्वाल्हेरमध्ये एका 9 वर्षीय मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय आहे. खून केल्यानंतर मृतदेह झुडपात फेकून दिला. मुलीला तिच्या नातेवाईकाने नेले होते. मुलीला घेऊन जाताना नातेवाईक सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Body of 9year old girl found in Gwalior) (Crushed to death by stone after rape) (Rape and murder of minor girl)

ग्वाल्हेरमध्ये 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या

author img

By

Published : Jun 28, 2022, 3:11 PM IST

ग्वाल्हेर - ग्वाल्हेरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. अल्पवयीन मुलीवर आधी बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करून झुडपात फेकण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे (Rape and murder of minor girl). ही मुलगी 2 दिवसांपासून बेपत्ता होती. तिचे वय सुमारे 9 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे (Body of 9year old girl found in Gwalior). माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोस्टमाॉर्टेमसाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

ग्वाल्हेरमध्ये 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या

दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता : शहरातील हजीरा पोलीस ठाणे परिसरात राहणारी ही अल्पवयीन मुलगी २ दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी सांगितले की, मुलगी तिचा भाऊ आणि मुलांसोबत घराबाहेर खेळत होती. त्यानंतर नातेवाईक तिला घेऊन गेला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात एक नातेवाईक मुलीला रेल्वे ओव्हर ब्रिजखाली घेऊन जाताना दिसत आहे (Crushed to death by stone after rape). हा नातेवाईक घरी येत असे, असे घरच्यांनी सांगितले.

आरोपीचा शोध सुरू: पीडितेच्या कुटुंबीयांनी त्याचे नाव कल्ला उर्फ ​​कल्लू राठौर असे सांगितले आहे. पोलीस आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी नातेवाईकाचा शोध घेत आहेत. हजीरा येथील वजन काट्याजवळ अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या अंगावर कपडे नव्हते. पोलिस अधीक्षक अमित सांघी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. हत्येपूर्वी मुलीसोबत गैरकृत्य झाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचबरोबर पोलीस प्रत्येक बाजूने तपास करण्यात व्यस्त आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.