ETV Bharat / bharat

Boat Capsizing In Indravati River: बोट उलटल्यानं सात जणांना जलसमाधी, कुठं घडली घटना? - Seven people drowned after the boat capsized

Boat Capsizing In Indravati River : दंतेवाडा येथे इंद्रावती नदीत बोट उलटून भीषण दुर्घटना झाली आहे. मुचनार घाटात एक बोट उलटल्यानं सात जणांना जलसमाधी मिळाली आहे. घटनास्थळी मदत बचाव कार्य सुरू आहे.

Boat Capsizing In Indravati River
Boat Capsizing In Indravati River
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 6:10 PM IST

दंतेवाडा Boat Capsizing In Indravati River : दंतेवाडा येथील इंद्रावती नदीत मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मुचनार घाटात बोट उलटल्याने सात जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक होते. नागरिक नदी ओलांडत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतय.

बोट लहान असल्यामुळं अपघात : बोट लहान असल्यामुळं त्यात क्षमतेपेतक्षा जास्त नागरिक बसले होते. त्यामुळं ती पाण्यात बुडाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामध्ये महिलांसह लहान मुलांचा समावेश आहे. मदत, बचाव कार्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच सुरक्षा दलाच्या तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

तीन जणांचे प्राण वाचले : या अपघातात एका व्यक्तीनं पोहून तीन जणांना जीवनदान दिलं आहे. तर दोन जण झाडाच्या फांदीच्या मदतीनं नदीतून बाहेर पडेल. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व गावकरी बरसूर आठवडी बाजारातून परतत असताना हा अपघात झाला. सध्या या अपघातात बेपत्ता झालेल्या ग्रामस्थांचा शोध सुरू आहे. ग्रामस्थ कोणत्या गावातील आहेत? याची देखील माहिती घेण्यात येत आहे. दंतेवाडा जिल्हा मुख्यालयातील गोताखोरांसह पोलीस, जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. यासोबतच बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • लोकांचा शोध सुरू : अपघातानंतर जिल्हा प्रशासन मुचनार घाटात सक्रिय झाले आहे. गोताखोरांच्या पथकानं इंद्रावती नदीत बेपत्ता झालेल्या गावकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. बेपत्ता लोकांचा अद्याप शोध लागलेला नाही. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन, पोलीस हाय अलर्ट मोडवर आहेत.

हेही वाचा -

Students Write Wishes On Temple : कोटामधील नैराश्यग्रस्त विद्यार्थी 'या' मंदिराच्या भिंतीवर लिहितात नवस! वाचा स्पेशल स्टोरी

Crime News : मुंबईत इमारत प्रकल्प मिळवून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची १२७ कोटी रुपयांची फसवणूक

G20 summit : जी-२० शिखर परिषदेत फारारी गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणावर भारताचा भर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.