नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांच्या टीकेला प्रह्लाद जोशी यांनी जोरदार पलटवार केला. राहुल गांधी मातृभूमीला कलंकित करण्यासाठी परदेशी भूमीचा वापर करत असल्याचा केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी यांनी केला आहे. राहुल गांधी हे फेक गांधी असल्याची टीकाही प्रह्लाद जोशी यांनी यावेळी केली आहे.
मिस्टर फेक गांधी! भारताचा गाभा हा तिची संस्कृती आहे. देशाला कलंकित करण्यासाठी परकीय भूमीचा वापर करणाऱ्या तुमच्या विपरीत, भारतीयांना त्यांच्या इतिहासाचा खूप अभिमान आहे आणि ते त्यांच्या सीमेचे रक्षण करू शकतात. - प्रह्लाद जोशी, केंद्रीय मंत्री
काय म्हणाले होते राहुल गांधी : राहूल गांधी मंगळवारी अमेरिकेत पोहचल्यानंतर त्यांनी पंतपर्धान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदी यांनी भारत जोडो यात्रा रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र भारत जोडो यात्रा वाढत गेली. भारत जोडो यात्रेचा नागरिकांच्या मनावर परिणाम होत गेला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी कितीही भारत जोडो रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही ही यात्रा रोखल्या जाऊ शकली नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला.
फेक गांधी म्हणत प्रह्लाद जोशींची टीका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर झालेल्या हल्ल्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री जोशी यांनी ट्विट करत राहुल गांधींना फेक गांधी म्हटले आहे. मिस्टर फेक गांधी! भारताचा गाभा हा तिची संस्कृती आहे. देशाला कलंकित करण्यासाठी परकीय भूमीचा वापर करणाऱ्या तुमच्या विपरीत, भारतीयांना त्यांच्या इतिहासाचा खूप अभिमान आहे आणि ते त्यांच्या सीमेचे रक्षण करू शकतात, असे ट्विट प्रह्लाद जोशी यांनी केले आहे.
बटाट्यापासून सोने बनवल्याचा दावा : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याने केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी यांनी राहुल गांधींवर ताशेरे ओढले. ज्याला काहीच कळत नाही, असा माणूस अचानक प्रत्येक गोष्टीत कसा निष्णात होतो, हे मजेदार आहे. राहुल गांधींच्या ज्ञानावर आणि गांधी कुटुंबावर प्रह्लाद जोशी यांनी प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह केले. ज्या माणसाला इतिहासाचे ज्ञान त्याच्या कुटुंबाच्या पलीकडे जात नाही, तो इतिहासाबद्दल बोलतोय. बटाट्यापासून सोने बनवल्याचा दावा करणारा माणूस विज्ञानाविषयी व्याख्यान देत आहे आणि कौटुंबिक बाबींच्या पलीकडे कधीही न गेलेला माणूस आता भारताच्या युद्धाचे नेतृत्व करू इच्छित आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
परदेश दौऱ्यांमध्ये भारताचा अपमान : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेत केलेल्या टीकेमुळे देशांतर्गत राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मोदी सरकारचे मंत्री आणि भाजपचे नेते अमेरिकेत राहुल गांधींच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधी त्यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये भारताचा अपमान करतात. पंतप्रधान मोदींनी अलीकडेच त्यांच्या परदेश दौऱ्यात जगभरातील 24 पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. 50 हून अधिक बैठका घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी 'पीएम मोदी हे बॉस' असे म्हटले तेव्हा राहुल गांधींना ते पचनी पडले नसल्याचेही अनुराग ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा -