ETV Bharat / bharat

NDA Meeting : यूपीए विरोधात काय आहे भाजपचा 'काउंटर प्लॅन'? विरोधकांच्या ऐक्याला असे देणार आव्हान

बंगळुरूमध्ये होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमुळे एनडीएमध्ये देखील हालचालींना वेग आला आहे. एनडीएची व्याप्ती वाढवण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करत आहे. एनडीएमध्ये 25 हून अधिक पक्षांचा समावेश करण्यात आला आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आमच्या बैठकीत सर्व पक्षांना एकत्र पाहून भाजप घाबरला आहे, त्यामुळेच ते आता एनडीएबाबत बोलू लागले आहेत, असे खरगे म्हणाले.

NDA
एनडीए
author img

By

Published : Jul 17, 2023, 8:05 PM IST

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने एनडीए आणि यूपीए या दोन्ही आघाडीचे प्राधान्य आपापल्या गटात अधिकाधिक पक्ष जोडण्याला आहे. पाटणा येथील विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आता भाजपप्रणीत एनडीएने कंबर कसली आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, मंगळवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत 31 राजकीय पक्ष सहभागी होऊ शकतात.

  • Suheldev Bharatiya Samaj Party chief Om Prakash Rajbhar has decided to join the NDA alliance led by Prime Minister Narendra Modi. I welcome him to the NDA family, tweets Union Home Minister Amit Shah pic.twitter.com/SQnvsZHrCJ

    — ANI (@ANI) July 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एनडीएच्या बैठकीला हे नेते उपस्थित राहणार : एनडीएच्या बैठकीत एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले, अनुप्रिया पटेल, ओम प्रकाश राजभर, संजय निषाद, नेफियू रिओ, कोनार्ड संगमा, जीतन राम मांझी आणि चिराग पासवान हे नेते सहभागी होणार आहेत. बिहारमधील उपेंद्र कुशवाह यांचा पक्षही एनडीएमध्ये सामील होणार आहे. यात आंध्र प्रदेशातील अभिनेता पवन कल्याणही सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. काही इतर पक्षांनी देखील पुष्टी केली आहे. त्यापैकी एआयएडीएमके, मिझो नॅशनल पार्टी, असम गण परिषद, एजेएसयू, तमिळ मनिला काँग्रेस, जेजेपी, एसकेएफ आणि अकाली दलाशी अजूनही चर्चा सुरू आहे.

भाजप विरोधी पक्षांचा मुकाबला कसा करेल : भाजपला माहीत आहे की, 2024 मध्ये चांगली कामगिरी करायची असेल तर उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागतील. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीने भाजपची राजकीय गणिते गोंधळात टाकली आहे. त्यामुळेच पक्षाचा या राज्यांतील छोट्या पक्षांवर डोळा आहे. वेळ पडल्यावर त्यांचा राजकीय गैरफायदा घेता यावा म्हणून त्यांच्या माध्यमातून दोन ते चार टक्के मतेही वळवण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे. बघूया, या राज्यांमध्ये भाजपची किती प्रगती होतेय.

  • कुछ लोग अनावश्यक भ्रम न फैलाएं। कल एनडीए की बैठक में मैं शामिल रहुंगा। निमंत्रण कल‌ ही मिल चुका है।

    — Upendra Kushwaha (@UpendraKushRLJD) July 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे महाराष्ट्राची रणनीती : महाराष्ट्राची राजकीय स्थिती कोणापासून लपलेली नाही. भाजपने आधी शिवसेनेच्या शिंदे गटाशी तडजोड केली आणि आता राष्ट्रवादीच्या एक गटालाही एनडीएमध्ये सामिल करून घेतले आहे. मंत्रिपदाच्या वाटपावरून या पक्षांमध्ये खडाजंगी सुरू असली तरी राज्यात अपेक्षित यश मिळेल, अशी आशा भाजपला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन विरोधी नेते आहेत. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला गेल्या वेळी सात टक्के मते मिळाली होती, मात्र एकही जागा मिळाली नव्हती. लोकसभेच्या तीन जागांवर त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्यामुळे तीन जागा गमावल्याचा यूपीएचा दावा आहे. प्रकाश आंबेडकर हे या पक्षाचे नेते आहेत. सध्या ते यूपीएचे भागीदार आहेत.

काय आहे यूपीची रणनीती : उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने सुहेलदेव समाज पक्षाला आपल्या गोटात घेतले आहे. ओमप्रकाश राजभर हे पक्षाचे नेते आहेत. ते आता एनडीएचा भाग झाले आहेत. ते लोकसभेच्या 10-15 जागांवर प्रभाव टाकू शकतात, असा राजभर यांचा दावा आहे. यूपीमध्ये राजभर समाजाची लोकसंख्या 4 टक्के आहे. 2022 ची विधानसभा निवडणूक त्यांनी समाजवादी पक्षासोबत लढवली होती. मात्र राजकीय मतभेदांमुळे ते तेथून एनडीएमध्ये परतले. राजभर यापूर्वीही एनडीएमध्ये होते. तसेच ते यूपीच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते.

हे पक्ष एनडीएसोबत : या सोबतच यूपीतील ओबीसी समाजातून आलेले दारा सिंह चौहान यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चौहान हे एसपीकडेही गेले होते. मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अपना दल भाजपसोबत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अपना दलाला १.२ टक्के मते मिळाली होती. त्यांचे दोन खासदार आहेत. त्यांचा कुर्मी मतदारांवर प्रभाव असल्याचे मानले जाते. निषाद पक्षही यावेळी एनडीएसोबत आहे. एकेकाळी निषाद पक्ष सपासोबत असायचा. पश्चिम यूपीमध्ये जयंत चौधरी यांच्यावर भाजपची नजर असल्याचे बोलले जात आहे. जयंत चौधरी हे जाट नेते आहेत. माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे ते पुत्र आहेत. सध्या जयंत चौधरी हे सपासोबत असले तरी ते विरोधी पक्षांच्या बैठकीला गेलेले नाहीत.

काय आहे बिहार-झारखंडची रणनीती : त्याचप्रमाणे बिहारमध्ये देखील प्रत्येक जागेवर समीकरणे जुळवली जात आहेत. या रणनीतीनुसार भाजपने माजी केंद्रीय मंत्री आणि दलित नेते रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांना एनडीएमध्ये प्रवेश दिला आहे. चिरागचे काका पशुपती पारसही सध्या एनडीएमध्ये आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलजेपीच्या या गटाला समेट हवा आहे. परंतु हाजीपूर लोकसभा जागेवरून हे प्रकरण अडकले आहे. पशुपती पारस हे हाजीपूरचे खासदार आहेत. ते आपली जागा सोडायला तयार नाहीत. दुसरीकडे, वस्तुस्थिती अशी आहे की चिराग पासवान हे जमुईचे खासदार आहेत, पण यावेळी त्यांना हाजीपूरमधून निवडणूक लढवायची आहे. सूत्रांनी सांगितले की, चिरागला त्यांच्या वडिलांच्या जागेशी भावनिक जोड आहे. पण जेव्हा त्यांना विचारण्यात आले की जर असे होते तर ते 2019 मध्ये जमुईला का गेले, यावर त्यांच्या बाजूने कोणतेही उत्तर आले नाही. भाजपसाठी चांगली गोष्ट म्हणजे चिराग पासवान यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीत आठ टक्के मते मिळाली होती.

बिहारमधील भाजपचे साथीदार : बिहारचा दुसरा पक्ष 'हम' एनडीएचा भाग झाला आहे. त्याचे नेते जीतनराम मांझी आहेत. मांझी हे नितीश कुमारांचे सहकारी होते. पण त्यांनी बाजू बदलली. त्यांच्या आणि चिराग पासवान यांच्या आगमनाने बिहारच्या दलित मतदारांवर आपली पकड मजबूत होईल, अशी भाजपला आशा आहे. यामध्ये उपेंद्र कुशवाह यांचेही नाव घेतले जात आहे. कुशवाह यांनी एनडीएच्या बैठकीत आपला सहभाग निश्चित केला आहे. मोदींच्या पहिल्या कार्यकाळात ते मंत्रीही होते. मात्र नंतर ते जेडीयूमध्ये दाखल झाले. आता ते पुन्हा नितीश यांच्या विरोधात गेले आहेत. तीच अवस्था मुकेश साहनी यांची आहे. ते एनडीएचा भाग होते. मात्र राजकीय मतभेदामुळे ते वेगळे झाले. आता पुन्हा एकदा ते भाजपसोबत जाऊ शकतात अशी चर्चा आहे. झारखंडमध्ये ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन भाजपसोबत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना चार टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती.

एनडीएच्या बैठकीत सहभागी होणारे पक्ष : भाजप, एआयएडीएमके, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), एनपीपी (नॅशनल पीपल्स पार्टी), एनडीपीपी (राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी), एसकेएम (सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा), जेजेपी (जननायक जनता पार्टी), आयएमकेएमके (इंडिया मक्कल कालवी मुन्नेत्र कळघम), एजेएसयू (ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन), आरपीआय (रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया), एमएनएफ (मिझो नॅशनल फ्रंट), टीएमसी (तमिळ मनिला काँग्रेस), आयपीएफटी (त्रिपुरा), बीपीपी (बोडो पीपल्स पार्टी), पीएमके (पाटली मक्कल काची), एमजीपी (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी), अपना दल, एजीपी (आसाम गण परिषद), राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी, निषाद पार्टी, यूपीपीएल (युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल), एआयआरएनसी (ऑल इंडिया एनआर काँग्रेस पुद्दुचेरी), शिरोमणी अकाली दल युनायटेड (धिंडसा) आणि जनसेना (पवन कल्याण), जीतन राम मांझी यांची एचएएम, उपेंद्र कुशवाहाची आरएलएसपी, मुकेश साहनी यांची व्हीआयपी पार्टी, ओम प्रकाश राजभर यांची सुभाषपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट).

2019 मधील एनडीएच्या मतांची टक्केवारी : 2019 मध्ये एनडीएला 37 टक्के मते मिळाली होती. म्हणजेच 63 टक्के मते विरोधात पडली होती. आता विरोधक 63 टक्के मतं एकत्र करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत आहेत, मात्र विरोधी पक्षांचा नेता कोण असेल, या मुद्द्यावर कोणीही बोलायला तयार नाही. ही त्यांची रणनीती आहे. कारण नेतेपदाची चर्चा झाली तर ऐक्याच्या प्रयत्नांना फटका बसेल, हेही त्यांना माहीत आहे.

हेही वाचा :

  1. Opposition Parties Meeting in Bengaluru : सोनिया गांधींसह राहुल गांधी विरोधी पक्षाच्या बैठकीसाठी बंगळुरुला रवाना, महाबैठकीत 24 पक्ष होणार सहभागी
  2. Opposition Meeting : विरोधी पक्षांची बैठक, केजरीवाल उपस्थित राहणार की नाही?
  3. Om Prakash Rajbhar : युपीत भाजप आणखी मजबूत होणार, ओमप्रकाश राजभर यांचा एनडीएमध्ये प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.