ETV Bharat / bharat

Brij Bhushan Singh : 'जगात फक्त दोनच प्रेमी जन्माला आले - एक शाहजहान, दुसरा ब्रिजभूषण!', भाजपा खासदाराचे धक्कादायक वक्तव्य

author img

By

Published : Aug 15, 2023, 10:41 PM IST

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आरोप असणारे भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी आता एक खळबळजनक विधान केले. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलताना ब्रिजभूषण सिंह यांनी स्वत:चा तुलना चक्क मुगल बादशाह शाहजहानशी केली. वाचा पूर्ण बातमी...

Brij Bhushan Singh
ब्रिजभूषण सिंह
पहा काय म्हणाले ब्रिजभूषण सिंह

गोंडा (उत्तर प्रदेश) : स्वातंत्र्यदिनी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी आपली तुलना चक्क मुगल बादशाह शाहजहानशी केली. ते म्हणाले की, जगात फक्त दोनच प्रेमी जन्माला आले - एक शाहजहान आणि दुसरा ब्रिजभूषण! 'शाहजहानने ताजमहाल बांधला होता, मी नंदिनी नगर बांधले', असे ते म्हणाले. तसेच 'देशाच्या फाळणीला जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आपण जिंकलेले क्षेत्र गमावले, असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले.

अशी केली तुलना : खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मंगळवारी त्यांचे वडिलोपार्जित निवासस्थान बिष्णोहरपूर ते नवाबगंजच्या नंदिनी नगरपर्यंत तिरंगा यात्रा काढली. यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना ब्रिजभूषण सिंह यांनी नंदिनी नगर हे नाव कुठून आले, असा प्रश्न मंचावरून केला. ते म्हणाले की, काही लोकांमध्ये अशी चर्चा होती की नंदिनी हे ब्रिजभूषणच्या आईचे नाव आहे. काही लोकांनी मुलीचे नाव सांगितले तर काही लोकांनी ते माझ्या मैत्रिणीचे नाव असल्याचे सांगितले. यावर त्यांनी स्वतःची तुलना मुघल सम्राट शाहजहानशी केली. ते म्हणाले की, शाहजहानने आपल्या प्रेयसीच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला होता. ब्रिजभूषण यांनी नंदिनी नगरची स्थापना केली.

फाळणीसाठी नेहरू जबाबदार : यावेळी जनतेला संबोधित करताना ब्रिजभूषण सिंह यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले. 'भाजपाने काश्मीरमधून कलम ३७० हटवले. भाजपाला एवढी ताकद दिल्याबद्दल आम्ही जनतेचे आभारी आहोत, असे ते म्हणाले. या सोबतच त्यांनी देशाच्या फाळणीसाठी जवाहरलाल नेहरूंना जबाबदार धरले. त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची फाळणी झाली, असे ते म्हणाले. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तेव्हा नेहरूंनी जिंकलेला भाग परत दिला. परराष्ट्र सुरक्षा सल्लागाराच्या सांगण्यावरून लष्कराला परत बोलावण्यात आले. जिंकलेली जमीनही फुकट परत दिली, अशी टीका ब्रिजभूषण सिंह यांनी केली.

हेही वाचा :

  1. Brijbhushan Singh : 'देशात सनी लिओनसारख्या महिलांची संख्या वाढत आहे', ब्रिजभूषण सिंह यांच्या वकिलाचे खळबळजनक विधान
  2. Brij Bhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात खासदार ब्रिजभूषण सिंह यांना दिलासा
  3. Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह यांनी फेटाळले लैंगिक शोषणाचे आरोप, म्हणाले, 'डोनाल्ड ट्रम्पही..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.