रायपूर BJP Leader Murder In Mohla Manpur : मोहला मानपूर अंबागड चौकीत भाजपा नेता बिरजू ताराम यांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली आहे. या हत्येवरुन छत्तीसगडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बिरजू ताराम यांच्या हत्येवरुन माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांनी भूपेश बघेल यांच्यावर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वी राज्यातील या प्रकारामुळं छत्तीसगड आता बंगाल होत असल्याचं दिसून येतंय.
-
मोहला-मानपुर के आदिवासी भाजपा नेता बिरझू तारम की हत्या कर एक बार फिर भाजपा कार्यकर्ताओं को डराने की कोशिश की जा रही है।
— Dr Raman Singh (@drramansingh) October 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मैं शोक-संतप्त परिजनों के प्रति संवेदनाएँ व्यक्त करते हुए यह वादा करता हूँ कि इस कुशासन के विरुद्ध हम डरने या रुकने वाले नहीं है। इस अत्याचारी सरकार से लहू के… pic.twitter.com/ht8umvLg98
">मोहला-मानपुर के आदिवासी भाजपा नेता बिरझू तारम की हत्या कर एक बार फिर भाजपा कार्यकर्ताओं को डराने की कोशिश की जा रही है।
— Dr Raman Singh (@drramansingh) October 20, 2023
मैं शोक-संतप्त परिजनों के प्रति संवेदनाएँ व्यक्त करते हुए यह वादा करता हूँ कि इस कुशासन के विरुद्ध हम डरने या रुकने वाले नहीं है। इस अत्याचारी सरकार से लहू के… pic.twitter.com/ht8umvLg98मोहला-मानपुर के आदिवासी भाजपा नेता बिरझू तारम की हत्या कर एक बार फिर भाजपा कार्यकर्ताओं को डराने की कोशिश की जा रही है।
— Dr Raman Singh (@drramansingh) October 20, 2023
मैं शोक-संतप्त परिजनों के प्रति संवेदनाएँ व्यक्त करते हुए यह वादा करता हूँ कि इस कुशासन के विरुद्ध हम डरने या रुकने वाले नहीं है। इस अत्याचारी सरकार से लहू के… pic.twitter.com/ht8umvLg98
छत्तीसगडमध्ये पश्चिम बंगालप्रमाणे परिस्थिती : छत्तीसगडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे. छत्तीसगडची स्थिती पश्चिम बंगालसारखी झाली आहे. निवडणुकीचा हंगाम सुरू होताच भाजप नेत्यांवर दबाव आणला जातोय. औंधीजवळील बिरजू ताराम हे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मोहला मानपूर येथील माझ्या कार्यक्रमात त्यांनी माझं स्वागत केलं होतं. रॅलीतही सहभागी झाले होते. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की तो भाजपाचे कार्यकर्ता होते. दुर्गामातेच्या स्थापना कार्यक्रमात त्यांचा हातभार लागतो. काही लोकांनी त्यांना धमक्या दिल्या होत्या. त्याचाच हा परिणाम आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर प्रहार केलाय.
छत्तीसगड सरकार शांत बसले आहे. भाजपा नेत्यांच्या कार्यकर्त्यांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ठरलंय. मोहला मानपूर येथील भाजप नेत्याच्या हत्येला भूपेश बघेल सरकार जबाबदार आहे. तेथील स्थानिक प्रशासन जबाबदार आहे. अशा धमक्या देणाऱ्यांवर आधीच कारवाई झाली असती, तर अशा घटना घडल्या नसत्या. - रमण सिंग, माजी मुख्यमंत्री, छत्तीसगड
हे तर टार्गेट किलिंग : छत्तीसगड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ यांनी भाजपा नेत्याच्या हत्येला टार्गेट किलिंग म्हटलंय. भाजप कार्यकर्त्याचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही, असंही साओ म्हणाले. गुंडाराजला संरक्षण देणाऱ्या काँग्रेस सरकारला आम्ही उखडून टाकू आणि शांतता देणारं सरकार आणण्याचा दावाही त्यांनी केलीय.
घरात घुसून भाजपा नेत्याची हत्या : नव्यानं स्थापन झालेल्या मोहला-मानपूर-अंबागड चौकीच्या औंधी पोलीस स्टेशन हद्दीतील सरखेडा इथं शुक्रवारी संध्याकाळी भाजपा नेते बिरजू ताराम यांची हत्या करण्यात आली. अज्ञात लोकांनी त्यांच्या घरात घुसून भाजपा नेत्यावर गोळी झाडून पळ काढला. तेव्हापासून संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण आहे. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केलाय. या घटनेकडं नक्षलवादी दृष्टिकोनातूनही पाहिलं जातंय. मृत बिरजू ताराम हे भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते.
7 नोव्हेंबरला मोहला मानपूरमध्ये निवडणूक : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली. यादरम्यान भाजपा नेत्यावर गोळीबार झाल्यानं परिसरात खळबळ उडाली. पहिल्या टप्प्यात मोहला मानपूरमध्ये 7 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 20 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस होता.
हेही वाचा :
- Assembly Elections 2023 Dates : पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं, कोणत्या राज्यात कधी मतदान, वाचा सविस्तर
- MP CG Assembly Election : मध्य प्रदेश-छत्तीसगड विधानसभा निवडणूक; भाजपाची पहिली यादी जाहीर
- Earthquake tremors: मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरसह छत्तीसगडमध्येही भूकंपाचे धक्के, लोकांत भीतीचे वातावरण