ETV Bharat / bharat

JP Nadda on Rahul Gandhi : राहुल गांधींचा अहंकार खूप मोठा, मात्र समज फार कमी आहे - जेपी नड्डा - राहुल गांधींचा अहंकार खूप मोठा

बदनामीच्या प्रकरणावरून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, राहुल गांधी खूप अहंकारी आहेत, मात्र त्यांची समज फारच कमी आहे.

JP Nadda
जेपी नड्डा
author img

By

Published : Mar 24, 2023, 12:21 PM IST

नवी दिल्ली : मानहानीच्या खटल्यात सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या एका दिवसानंतर, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'राहुल गांधींना अहंकार फार आहे, मात्र त्यांची समज लहान मुलासारखी आहे'. नड्डा यांनी आरोप केला की, राहुल गांधींनी आपल्या राजकीय फायद्यासाठी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आणि त्यांना 'चोर' म्हटले. ते म्हणाले, 'वारंवार समजावून सांगून देखील त्यांनी न्यायालयात माफी मागितली नाही. त्यांनी सातत्याने ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.'

'ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या' : शिक्षा सुनावल्यानंतरही राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष अहंकारपणामुळे आपल्या वक्तव्यावर ठाम राहून ओबीसी समाजाच्या भावना सतत दुखावत असल्याचा आरोप भाजप अध्यक्षांनी केला. ते म्हणाले, 'राहुल गांधींकडून झालेल्या या अपमानाचा बदला संपूर्ण ओबीसी समाज लोकशाही मार्गाने घेईल'. नड्डा यांनी दावा केला की, राहुल गांधींना तथ्यांच्या पलीकडे खोटे आरोप करण्याची सवय आहे. त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राफेल मुद्द्याला काँग्रेस महत्त्व देत असल्याचा उल्लेख केला.

'राफेलच्या नावावर देशाची दिशाभूल केली' : ते म्हणाले की, 'राफेलच्या नावावर राहुल यांनी देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आणि त्या बनावट आरोपासाठी राहुल गांधींना बिनशर्त माफी देखील मागावी लागली.' राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरूनही भाजप त्यांच्या माफी मागण्यावर ठाम आहे. या प्रकरणामुळे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही विस्कळीत झाले आहे. संसदेबाहेर आणि आत राहुल गांधी यांच्यावर भाजपचा सतत चौफेर हल्ला सुरू आहे.

रेणुका चौधरी यांचा मोदींवर मानहानीचा खटला : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एक ट्विटकरून नरेंद्र मोदींवर त्यांची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये राज्यसभेतील एका भाषणादरम्यान रेणुका चौधरी यांच्या हसण्यावर मिश्किल भाष्य केले होते.

हेही वाचा : Defamation Case Against PM Modi : मोदींनी मला शूर्पणखा म्हटल्याने मानहानीचा खटला दाखल करणार - रेणुका चौधरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.