ETV Bharat / bharat

Gangster Bishnoi : कुख्यात गँगस्टर बिष्णोई अमृतसरमध्ये दाखल.. ठिकठिकाणी ब्लॅक कमांडो, चिलखती वाहने तैनात

author img

By

Published : Jun 28, 2022, 10:21 AM IST

प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणात ( Sidhu moose wala Murder Case ) आरोपी असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आणण्यात आले ( Bishnoi appearance in Amritsar ) आहे. त्याला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने आठ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Bishnoi appearance in Amritsar
कुख्यात गँगस्टर बिष्णोई अमृतसरमध्ये दाखल

अमृतसर ( पंजाब ) : सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील ( Sidhu moose wala Murder Case ) आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला कडेकोट बंदोबस्तात दुपारी 12.30 वाजता पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आणण्यात ( Bishnoi appearance in Amritsar ) आले. लॉरेन्स बिश्नोईला सोमवारी संध्याकाळी मानसा न्यायालयात हजर केल्यानंतर अमृतसर पोलिसांनी 24 तासांच्या ट्रान्झिट रिमांडवर घेतले. लॉरेन्स बिश्नोईला न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

ब्लॅक कमांडोज आणि चिलखती वाहने तैनात : लॉरेन्स येण्यापूर्वीच पंजाबच्या विविध सुरक्षा यंत्रणा येथे हजर होत्या. SSOC सुरक्षा कडक करण्यात आली ( Amritsar under tight security ) आहे. ब्लॅक कमांडो आणि चिलखती वाहने बाहेर तैनात आहेत. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सिद्धू मुसेवाला हत्याकांडप्रकरणी बिश्नोई याची रात्रभर चौकशी करण्यात आली.

कडक सुरक्षाव्यवस्था : लॉरेन्स बिश्नोईला पोलिसांनी मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर केले. सकाळी लॉरेन्ससोबत पंजाब पोलिसांचा ताफा अमृतसर कोर्टाकडे रवाना झाला. त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. लॉरेन्सला न्यायालयात हजर केल्यानंतर अमृतसर पोलिसांनी आठ दिवसांची कोठडी मिळवली आहे. परिणामी, आता त्याला 6 जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. रिमांड मिळाल्यानंतर, त्याला पुन्हा एसएसओसी कार्यालयात नेण्यात आले, तेथे त्याची चौकशी केली जाईल.

राणा कंधोवालिया हत्येप्रकरणी रिमांड मिळाला: लॉरेन्स बिश्नोई याला अमृतसर येथील मजिठा रोड पोलीस स्टेशनने ३ ऑगस्ट २०२१ रोजी मारल्या गेलेल्या राणा कंधोवालियाच्या हत्येचा तपास करण्यासाठी आणले आहे. राणा कंधोवालिया यांची केडी रुग्णालयात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. रात्री अमृतसरमधील सर्कुलर रोडवर जेव्हा तो त्याच्या गावातील एका महिलेला भेटायला जात होता ज्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गँगस्टर जग्गू भगवानपुरियाने घेतली जबाबदारी : हत्येच्या दुसऱ्याच दिवशी गँगस्टर जग्गू भगवानपुरियाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी घेतली. पोलिसांनी नंतर जग्गू, जगरोशन सिंग हुंदल, मनप्रीत सिंग उर्फ ​​मणि रैया आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता पंजाब पोलिसांनी सिद्धू मुसेवाला हत्याकांडात लॉरेन्सला आणले असल्याने त्याची इतर प्रकरणांमध्येही चौकशी केली जाणार आहे.

हेही वाचा : लॉरेन्स बिश्नोईने मुसेवाला हत्याकांडातील मास्टरमाइंड असल्याची दिली कबुली -पंजाब पोलीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.