ETV Bharat / bharat

Bihar Train Accident : 'अचानक धक्का बसला अन्...', ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितली आपबिती, आतापर्यंत ४ ठार - Train Derailed In Buxar

Bihar Train Accident : बिहारमधील बक्सरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. येथे नॉर्थ ईस्ट सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 12506 च्या सहा बोगी रुळावरून घसरल्या आहेत. बक्सरच्या रघुनाथपूर रेल्वे स्थानकावर हा अपघात झाला असून या अपघातात आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय. ही ट्रेन दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनल येथून कामाख्याला जात होती.

Bihar Train Accident
बिहारमधील बक्सरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 12:27 PM IST

बिहारमधील बक्सरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला

बक्सर Bihar Train Accident : बिहारच्या बक्सरमधील रघुनाथपूर स्थानकाजवळ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरून भीषण अपघात झाला. या अपघातात रेल्वेच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या. तर दोन बोगी पूर्णपणे उलटल्या. दरम्यान, या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून त्यात आई आणि आठ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे, तर इतर दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

आम्ही आमच्या बर्थखाली दबलो होतो. बाहेर येताच ट्रेनला अपघात झाल्याचे दिसले. सर्व बोगी इकडे तिकडे पडून आहेत. आजूबाजूचे अनेक लोक घटनास्थळी येऊन लोकांना मदत करत असल्याचे आम्ही पाहिले. बोगीत घुसून, बाहेरून काचा फोडून ते प्रवाशांना बाहेर काढत होते. - अब्दुल मलिक,रेल्वे प्रवासी

तिघांची ओळख पटली : उषा भंडारी आणि तिची आठ वर्षांची मुलगी अमृता कुमारी अशी मृतांची नावं आहेत. त्या आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील सादियान गावातील रहिवासी होत्या. तिसऱ्या मृताचे नाव जैद (वय २७) असून तो बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील सप्तेय विष्णुपूरचा रहिवासी आहे. ते दिल्लीहून किशनगंजला जात होते. तर चौथ्या मृताची ओळख अद्यापही पटलेली नाही. मृतांव्यतिरिक्त १०० जण जखमी झाले आहेत.

रात्रीचे ९.०० वाजले होते, आम्ही आमच्या सीटवर बसून पेपरवर्क करत होतो. तेव्हा अचानक धक्का बसला आणि आम्ही आमच्या सीटवरून पडलो. काय झाले ते समजू शकले नाही. ट्रेनचा वेग १०० किमी असावा. आम्ही तिथे उभे राहिलो तोपर्यंत ट्रेनचा अपघात झाला होता. अपघात कसा झाला, असे विचारले असता, अपघात कसा झाला याचं उत्तर फक्त चालकच देऊ शकेल. - विजय कुमार, नॉर्थ ईस्ट १२५०५ ट्रेनचे गार्ड

काय म्हणाले प्रत्यक्षदर्शी : मृतांच्या नातेवाईकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, एसी बोगीतील सर्व प्रवासी जवळपास झोपले होते, तेव्हा अचानक ट्रेनला धक्का बसला अन् सर्वजण आपापल्या जागेवरुन खाली पडू लागले. सुमारे १० ते १५ मिनिटे ट्रेनमध्ये जोरदार हादरे बसले. कोणाला काही समजेपर्यंत ट्रेनच्या सर्व २३ बोगी रुळावरून घसरल्या होत्या.

हेही वाचा -

  1. Bihar Train Accident : बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात, दिल्लीहून येणारी नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरली
  2. Bihar Accident : बिहारमध्ये कंटेनर आणि स्कॉर्पिओची जोरदार धडक, ७ जणांचा जागीच मृत्यू
  3. Police Firing In Bihar : बिहारमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट, पोलिसांच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.