पाटणा : बिहारमध्ये सध्या कोणत्याही मुद्द्यावरून राजकारण तपासाला सुरूवात झाली आहे. राजकारणी कोणत्याही व्यासपीठावर गेली तरी त्यांच्या वक्तव्यामुळे वाद विवाद हे होत असतात. आता बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. रामचरितमानस हा समाजात द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे, असे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. बुधवारी 11 जानेवारी रोजी पाटणा येथील बापू सभागृहात नालंदा मुक्त विद्यापीठाचा 15 वा दीक्षांत समारंभ पार पडला.
बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे वादग्रस्त विधान : सभागृहात उपस्थित हजारो विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणमंत्री म्हणाले की, प्रेमाने भारत मजबूत आणि समृद्ध होईल, द्वेषामुळे नाही. देशात 6 हजारांहून अधिक जाती आहेत. जितक्या जाती आहेत तितकाच द्वेष आहे. अशा परिस्थीतीत भारत विश्वगुरू होऊ शकत नाही. आपल्या भाषणादरम्यान, शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस ग्रंथाच्या काही भागाचे वाचन केले आणि सांगितले की हा ग्रंथ समाजात द्वेष पसरवण्याच काम करत आहे.
मनुस्मृतीने समाजात द्वेषाचे बीज : मनुस्मृतीने समाजात द्वेषाचे बीज पेरले. त्यानंतर रामचरितमानसने समाजात द्वेष निर्माण केला, आणि आज गुरु गोळवलकरांचे विचार समाजात द्वेष पसरवत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले कारण त्यात दलित आणि वंचितांचे हक्क हिरावून घेण्याचा उल्लेख होता चंद्रशेखर यांनी म्हटले. त्याशिवाय कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांना जातीचे बंधन तोडण्याचे आवाहन केले.
'शिक्षकांना जात जनगणनेत सहभागी करून घेणे चुकीचे नाही' : कोणाची जात विचारण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुमची जात कोणाला सांगू नका. तुमचे व्यक्तिमत्व तुमच्यासाठी पुरेशी ओळख आहे. चांगले काम करा, तुमची चांगली ओळख निर्माण होईल असे त्यांनी पुढे म्हटे. अशा स्थितीत सरकार जात जनगणना करत आहे? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, यावर चंद्रशेखर म्हणाले की, समाजातील बहुसंख्य वंचित घटकांना दडपून ठेवण्यात आले होते. अशा परिस्थितीत जात जनगणना करून त्यांना योग्य तो सन्मान देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र जात जनगणनेवेळी आपली जात सांगणार का, यावर त्यांनी मौन पाळले.
हेही वाचा : Panchang : काय आहे आजचा अमृत काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ; जाणून घ्या आजचे पंचांग