ETV Bharat / bharat

बिहार : सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचे नितीश कुमारांना आमंत्रण - बिहार मुख्यमंत्री नितीश कुमार

बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी जेडीयू पक्षाचे नेते नितीश कुमार यांना सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आज नितीश कुमार यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड केली.

नितीश कुमार
नितीश कुमार
author img

By

Published : Nov 15, 2020, 4:16 PM IST

पाटणा - बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी जेडीयूचे नेते नितीश कुमार यांना आज (रविवार) सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. काल नितीश कुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) १२५ आमदारांची यादी घेऊन राज्यपालांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर राज्यपालांनी नितीश कुमारांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे.

उपमुख्यमंत्र्यांबाबत नितीश कुमारांचे मौन

आम्ही राज्यपालांकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपा, जनता दल युनायटेड, हिंदुस्तानी अवामी मोर्चा, विकसशील इन्सान पार्टी या पक्षातील नवनियुक्त आमदारांची यादी सोपविली असून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांनी आमचे पत्र स्वीकारले आहे. त्यांनी सत्ता स्थापनेसाठी आम्हाला आमंत्रण दिले आहे, असे नितीश कुमार यांनी सांगितले. मात्र, उपमुख्यमंत्री पदासाठी कोण उमेदवार असेल याबाबत त्यांनी मौन बाळगले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजप नेते सुशील कुमार मोदी राज्यपाल चौहान यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आज नितीश कुमार यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड केली. एनडीएच्या विधिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली होती, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. एनडीएमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांची निवड होते की, नाही याबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, निवडणुकीपूर्वीच ठरल्याप्रमाणे नितीश कुमार यांचीच मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात येईल, असे भाजपाने स्पष्ट केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.