ETV Bharat / bharat

Biden Meets Ukraine Foreign Ministers : जो बायडेन यांनी घेतली युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट

जो बायडेन यांनी शनिवारी पोलंडची राजधानी वारसॉ येथे युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. (Biden Meets Ukraine Foreign Ministers )रशियाचे आक्रमण सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि कीवमधील उच्च पदस्थ अधिकारी यांच्यात वन-ऑन-वन ​​चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलंडमध्ये युक्रेनच्या मंत्र्यांसोबत जो बायडेन यांची भेट रशियाला चिथावणी देणारी ठरू शकते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
author img

By

Published : Mar 27, 2022, 10:30 AM IST

दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांची पोलंडमध्ये भेट घेतली आहे. मध्य वॉर्सातील मेरियट हॉटेलमध्ये ही भेट झाली. (Joe Biden visit to Poland) रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्चपदस्थांशी बायडेन यांनी प्रथमच थेट चर्चा केली आहे. शनिवारी (26 मार्च)रोजी ही भेट घेतली. यावेळी रशियन आक्रमणाचा एकजुटीने विरोध करत असल्याचा मुद्दा त्यांनी अदोरेखित केला.

रशियाची चढाई सौम्य? - युक्रेनवरील लढाई सौम्य करून रशियाच्या फौजा पूर्व युक्रेनमधील रशियाने पाठिंबा दिलेल्या युक्रेनच्या फुटीर प्रदेशांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे संकेत रशियाकडून देण्यात आले. राजधानी किव्हबाहेर रशियाने व्यापलेली गावे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी युक्रेनच्या फौजा आक्रमक झाल्या आहेत.

आतापर्यंत १३६ मुलांचा मृत्यू - रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा शनिवारी ३१ वा दिवस होता. आतापर्यंत या संघर्षांत १३६ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनच्या महाधिवक्ता कार्यालयाने दिली आहे. (Biden meets Ukraine's Foreign) गेल्या आठवड्यात मारिओपोलच्या एका सभागृहावर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात 300 नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. हा निष्पाप नागरिकांवरील सर्वात क्रूर प्राणघातक हल्ला असल्याचे युक्रेनतर्फे सांगण्यात आले आहे.

बायडेन यांच्याकडून पोलंडचे कौतुक - जो बायडेन यांनी शनिवारी पोलंडची राजधानी वारसॉ येथे युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. रशियाचे आक्रमण सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि कीवमधील उच्च पदस्थ अधिकारी यांच्यात वन-ऑन-वन ​​चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलंडमध्ये युक्रेनच्या मंत्र्यांसोबत जो बायडेन यांची भेट रशियाला चिथावणी देणारी ठरू शकते. खरे तर युक्रेनमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण केल्याबद्दल रशिया आधीच अमेरिकेला दोष देत आहे.

एअरबोर्न डिव्हिजनच्या सदस्यांना संबोधित - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे शनिवारी सकाळी यूएस आणि युक्रेनचे परराष्ट्र धोरण आणि संरक्षण नेत्यांच्या बैठकीत उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी यूएस आर्मीच्या 82 व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या सदस्यांना संबोधित केले. 'तुम्ही लोकशाही आणि उच्चभ्रूंची लढाईच्या मध्यभागी आहात,' लोकशाही टिकणार आहे की स्वैराचार चालणार आहे?, असे म्हणत त्यांनी रशियाला इशारा दिला आहे.

मानवतावादी प्रयत्न केले त्नांचे कौतुक - बायडेन पुढे म्हणाले की, 'आम्ही सुरुवातीपासूनच सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगत आहोत की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्ध थांबवण्यास भाग पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.' दरम्यान, बायडेय यांनी युक्रेनच्या लोकांना मदत करण्यासाठी ज्यांनी मानवतावादी प्रयत्न केले त्नांचे कौतुक केले आहे.

निर्वासितांना आश्रय दिल्याबद्दल पोलंडचे कौतुक - शुक्रवारी एक दिवस अगोदर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणातून बाहेर पडलेल्या 20 लाखांहून अधिक निर्वासितांना आश्रय दिल्याबद्दल पोलंडचे कौतुक केले. त्यांनी मानवतावादी प्रयत्न करणाऱ्यांशी संवाद साधला आणि लोकांच्या वाढत्या समस्यांवर मात करण्यासाठी काय केले पाहिजे यावर चर्चा केली.

पोलंडनं केलेली मदत वाखाणण्याजोगी - बायडेन म्हणाले की, त्यांना सीमेच्या जवळ जाण्याची आशा होती, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते मागे आले. परंतु दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपला सर्वात मोठ्या निर्वासित संकटाचा सामना करावा लागत असल्याने पोलंडनं केलेली मदत वाखाणण्याजोगी आहे. ती बाब अधोरेखित करण्यासाठी पोलंडला भेट द्यायची होती, असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - Oscars Awards 2022 : एंजेलिसमध्ये आज ऑस्कर पुरस्कार सोहळा;वाचा लाईव्ह कुठे पाहता येणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.