नवी दिल्ली - व्हॉट्सअॅपवरुन होणारा 'फेक न्यूज'च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅप एक नवीन अपडेच लॉंच करत आहे. यामुळे आता एखादा संदेश एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला, किंवा एकाच ग्रुपमध्ये फॉरवर्ड करता येणार आहे.
यापूर्वीदेखील व्हॉट्सअपने फेक न्यूजला आळा घालण्यासाठी अशी पावले उचचली आहेत. यापूर्वी कितीही लोकांना एक संदेश फॉरवर्ड करता येण्याची सुविधा काढून, व्हॉट्सअपने त्यावर केवळ पाच व्यक्तींची मर्यादा घातली होती. मात्र आता व्हॉट्सअपने त्याही पुढे जात नवे अपडेट आणले आहे, ज्यामुळे एकाच व्यक्तीला किंवा एकाच ग्रुपमध्ये संदेश पाठवता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच देशातील लोकांनी लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी लोक पूर्णपणे इंटरनेट - प्रामुख्याने व्हॉट्सअपवर अवलंबून आहेत. यातच लोक बराच वेळ व्हॉट्सअपवर व्यतीत करत असल्यामुळे वेगवेगळ्या अफवांना वाव मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून व्हॉट्सअप हे नवीन अपडेट लॉंच करत आहे.
हेही वाचा : आसाम : कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयावर आक्षेपार्ह भाष्य, आमदाराला अटक