चंदीगढ - बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेवरुन स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या ठिकाणाहून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला, त्याच हरियाणामध्ये आज महिला असुरक्षीत असल्याचे यादव म्हणाले. याठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण ४३ टक्क्यांनी वाढल्याचे यादव म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजत गाजत 22 जानेवारी 2015 ला बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा हरियाणातील पानीपत येथे शुभारंभ केला. मात्र, जेथे त्यांनी या योजनेचा शुभारंभ केला तेथेच महिलांवर अत्याचार वाढले आहेत. तेथील महिला असुरक्षीत असल्याचे समोर आले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे जनतेची दिशाभूल करत असल्याचेही ते म्हणाले.