लखनऊ - विविध राज्यांमध्ये अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या सर्व स्थलांतरित कामगारांना माघारी आणण्याचे योगी आश्वासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. स्थलांतरित कामगारांची यादी मागविण्यात येत आहे. आत्तापर्यंत ३७ रेल्वे गाड्यांतून ३० हजार नागरिकांना राज्यात माघारी आणल्याची माहितीही त्यांनी दिली.
याशिवाय बसद्वारे ३० हजार नागरिकांना राज्यात माघारी आणण्यात आले आहे. मात्र, उत्तर प्रदेशातली लाखो कामगार विविध राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. त्या सर्वांना राज्यात माघारी आणले जाईल, असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी अडकून पडलेल्या नागरिकांना दिले आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत साडेचार लाख कामगार राज्यात माघारी परतल्याचा दावा उत्तरप्रदेश सरकारने केला आहे. जिल्हानिहाय कामगारांची यादी मागविण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे आदित्यनाथ यांनी सांगितले. जे राज्ये नागरिकांची यादी देत आहेत, त्यांना लवकरात लवकर माघारी आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
माघारी आलेल्या कामगारांची तपासणी करण्यात येत असून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. तसेच त्यांना फूड पॅकेटसह एक हजार रुपयेही देण्यात येत आहेत. असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.