नवी दिल्ली- भारतनगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबल अमितचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. यानंतर त्याच्या पत्नी आणि मुलगा दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठण्यात आले होते. दोघांचेही नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
कॉन्स्टेबल अमितची 27 वर्षीय पत्नी आणि 3 वर्षांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने परिसरातील लोकांची चिंता वाढली आहे. दोघांनाही यानंतर रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे.
संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या दिल्ली पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे चित्र आहे.