ETV Bharat / bharat

'हाथरस प्रकरणावरून राहुल-प्रियांकांचं राजकारण'

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हाथरस प्रकरणावरून राजकारण करत आहेत, असे उत्तर प्रदेश राज्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंग म्हणाले. जस्थानमध्येही अशीच घटना घडली आहे. मग राहुल गांधी राजस्थानमध्ये का गेले नाही. कारण, त्यांना हाथरस प्रकरणावरूनच राजकारण करायचे आहे, असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेश राज्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंग

author img

By

Published : Oct 1, 2020, 5:47 PM IST

नवी दिल्ली - हाथरस बलात्कार पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्यानंतर काँग्रेसकडून निर्दशने करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाला भाजपा नेत्यांनी काँग्रेसची राजकीय खेळी म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हाथरस प्रकरणावरून राजकारण करत आहेत, असे उत्तर प्रदेश राज्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंग म्हणाले.

राजस्थानमध्येही अशीच घटना घडली आहे. मग राहुल गांधी राजस्थानमध्ये का गेले नाही? कारण, त्यांना हाथरस प्रकरणावरूनच राजकारण करायचे आहे. राजस्थानमध्ये झालेल्या घटनेवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी उत्तर द्यायला हवे, असे ते म्हणाले.

हाथरसमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रक कोर्टात होईल आणि अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असेही ते म्हणाले. तसेच उत्तर प्रदेश सरकार पीडितेच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत आणि एका घरासह कुटुंबातील एकाला नोकरी देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

काय प्रकरण ?

19 वर्षीय दलित तरुणी शेतात गेली असता चार तरुणांनी तिच्यावर अत्याचार केले होता. तसेच तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला होता. मंगळवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या घटनेनंतर योगी आदित्यनाथ सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना आडवण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.