ETV Bharat / bharat

'चीननं माहिती देण्याआधीच WHO ने कोरोना प्रसाराबाबत सतर्क केलं'

वुहान शहरात व्हायरल न्युमोनिया सदृष्य आजाराचा प्रसार होत असल्याची माहिती चीनमधील डब्ल्यूएचओच्या कार्यालयाने माध्यमांत पाहिली. त्यानंतर चीनला अहवाल मागितला, असे डब्ल्यूएचओ कार्यालयने सांगितले.

जागतिक आरोग्य संघटना
जागतिक आरोग्य संघटना
author img

By

Published : Jul 4, 2020, 12:38 PM IST

जिनिव्हा - चीनमधील वुहान शहरातून कोरोनाचा सर्वात पहिल्यांदा प्रसार झाला. मात्र, कोरोना प्रसाराबाबत चीनने माहिती देण्याआधी जागतिक आरोग्य संघटनेने सतर्क केले, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. कोरोनोबाबत अधिक माहिती घेण्यासाठी जानेवारीत चीनमध्ये तज्ज्ञ पथक पाठवण्याबाबत डब्यल्युएचओचे संचालक टेड्रोस घेब्रायसस यांनी चर्चा केली होती, असा दावा संघटनेने केला आहे. सुरुवातीला या आजाराला' व्हायरल न्युमोनिया' असे म्हणण्यात आले होते.

कोरोना प्रसाराची माहिती जगापासून लपविल्याचा आरोप चीनवर होत आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने जगाला महामारीची माहिती लवकर दिली नाही, असा आरोपही अमेरिकेने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओने ही माहिती दिली आहे. कोरोनाचा विषाणू प्राण्यांमधून माणसात कसा आला? कोरोनाचा उगम कसा झाला? याचा तपास करण्यासाठी पुढील आढवड्यात डब्ल्यूएचओचे पथक चीनमध्ये जाणार आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आत्तापर्यंत जगभरात 5 लाखांपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांची आणि रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौमय्या स्वामीनाथन या एका मुलाखतीत म्हणाल्या की, 'कोरोनाचा उगम कसा झाला, याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. डब्ल्यूएचओ चिनी सरकारबरोबर मिळून यासंबंधी काम करत आहे. पुढील आठवड्यात एक पथक तपासासाठी चीनला जाणार आहे.

31 डिसेंबर 2019 ला चीनमध्ये संसर्गजन्य न्युमोनियाचा पहिला रुग्ण आढळला. ही माहिती समजताच डब्ल्यूएचओने 1 जानेवारीला आपले काम सुरु केले. वुहान शहरात व्हायरल न्युमोनिया सदृष्य आजाराचा प्रसार होत असल्याची माहिती चीनमधील डब्युएचओच्या कार्यालयाने माध्यमांत पाहिली. त्यानंतर चीनला अहवाल मागितला, असे स्वामीनाथन यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.