नवी दिल्ली - व्हॉट्सअॅपचे ग्लोबल प्रमुख वील कॅथकार्ट पहिल्यांदाच दिल्लीमध्ये आले आहेत. शहरातील आयोजित एका कार्यक्रमात वील आणि नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी उपस्थितीती लावली आहे. यावेळी त्यांनी व्हॉट्सअॅप कशाप्रकारे लोकांशी संबध जोडत आहे याची माहिती दिली. तसेच व्यावसायिक व्हॉट्सअॅपच्या यशाविषयीही त्यांनी माहिती सांगितले.
व्हॉट्सअॅपचा व्यवसाय हा भारतात फार वेगाने प्रगती करत आहे. लहान व्यावसायिक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जात आहेत. भारतात व्हॉट्सअॅपचे सर्वात जास्त युजर्स आहेत. त्यामुळे आता भारतात 'व्हॉट्सअॅप पे' सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
व्हॉट्सअॅप पे विषयी सांगताना ते म्हणाले की, व्हॉट्सअॅप पे वर्षाच्या शेवटी लॉच करण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅप मध्ये व्यवहार करतानाची पद्धत फार सोपी असणार आहे.
काय आहे 'व्हॉट्सअॅप पे'?
'व्हॉट्सअॅप पे' ही 'नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' अर्थात 'एनपीसीआय'तर्फे तयार करण्यात आलेल्या 'यूपीआय'वर काम करते. या माध्यमातून ग्राहकांना रक्कम हस्तांतरीत करता येते.