कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभेने नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील ठराव मंजूर केला आहे. राज्य सरकारने हा ठराव मांडला होता. त्यामुळे आता सीएए विरोधात ठराव मंजूर करणारे पश्चिम बंगाल हे देशातील चौथे राज्य ठरले आहे.
संबधीत प्रस्तावात एनआरसी आणि एनपीआरला विरोध करण्यात आलेला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील ठराव याआधी केरळ, पंजाब आणि राजस्थान या तीन राज्यांनी मंजूर केला आहे.
यावेळी ममता बँनर्जी यांनी मोदींवर टीका केली. सीएए हा फक्त कायदा नसून मानवतेसाठी आणि भारतासाठी लज्जास्पद आहे. सीएए हा भाजपचा राजकीय अजेंडा असून तो संसदेत राबवत आहेत. भाजपचा हा राजकीय जाहीरनामा हे अस्वीकार्य आहे, असे ममता म्हणाल्या. पश्चिम बंगालमध्ये सीएए,एनआरसी लागू होऊ दिली जाणार नाही. तसेच, आम्ही शांततेच्या मार्गाने लढा सुरूच राहू देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
.