नवी दिल्ली - भाजपवर कडाडून टीका करणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाची प्रशंसा केली आहे. 'मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण हे अतिशय धैर्यवान, संशोधन केलेले आणि विचारपूर्ण होते. देशातील मुख्य समस्या त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडल्या', असे सिन्हा यांनी टि्वट करून म्हटले आहे.
-
Since I'm famous or infamous for calling a spade a spade, I must admit here, Hon'ble PM @narendermodi @PMOIndia that your speech from the #RedFort on 15th Aug’19 was extremely courageous, well researched & thought provoking. Superb delivery of the key problems facing the country.
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Since I'm famous or infamous for calling a spade a spade, I must admit here, Hon'ble PM @narendermodi @PMOIndia that your speech from the #RedFort on 15th Aug’19 was extremely courageous, well researched & thought provoking. Superb delivery of the key problems facing the country.
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) August 18, 2019Since I'm famous or infamous for calling a spade a spade, I must admit here, Hon'ble PM @narendermodi @PMOIndia that your speech from the #RedFort on 15th Aug’19 was extremely courageous, well researched & thought provoking. Superb delivery of the key problems facing the country.
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) August 18, 2019
देशामध्ये सध्या पाण्याच्या समस्येबरोबर वाढती लोकसंख्या हे खूप मोठे संकट आहे. या समस्येवर कुशलतेने उपाययोजना करण्याची गरज आहे. यापूर्वी खूप लोकांनी यावर भाषण दिले. मात्र, योग्य धोरण अवलंबले नाही. तुम्ही भारताला पुढे नेण्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. यासाठी तुमचे अभिनंदन, असे सिन्हा यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
-
I could also talk to you if you have the time & inclination on connecting the rivers, a dream of our beloved former PM #AtalBihariVajpayee, like the 'Sagar Mala' project.This would be tremendously beneficial in controlling the floods & drought situation of the country.
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I could also talk to you if you have the time & inclination on connecting the rivers, a dream of our beloved former PM #AtalBihariVajpayee, like the 'Sagar Mala' project.This would be tremendously beneficial in controlling the floods & drought situation of the country.
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) August 18, 2019I could also talk to you if you have the time & inclination on connecting the rivers, a dream of our beloved former PM #AtalBihariVajpayee, like the 'Sagar Mala' project.This would be tremendously beneficial in controlling the floods & drought situation of the country.
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) August 18, 2019
'जर तुम्हाला नदीजोड प्रकल्पामध्ये रूची असेल तर मी तुमच्याशी चर्चा करू शकतो. देश आपल्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे खूप उशीर होण्यापूर्वी आपण काम करायला हवे. सागरमाला योजना ही आपल्या प्रिय पंतप्रधान वाजपेयी यांचे स्वप्न होते. जर येत्या स्वातंत्र्यदिनी या योजनेची घोषणा केली. तर ते दुधात साखर मिसळल्यासारखे होईल. सर्जनशील आणि सकारात्मक योजनेत मी योगदान दिल्यास मला ही आंनद होईल', असे सिन्हा यांनी मोदींना उद्देशून म्हटले आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी अनेकदा मोदी सरकारच्या कार्यपद्धतीला विरोध करताना थेटपणे पंतप्रधान मोदींवर टीका केली होती.