ETV Bharat / bharat

मसूद अझहरसंदर्भातील संयुक्त राष्ट्राचा निर्णय निराशाजनक - परराष्ट्र मंत्रालय - मसूद

प्रस्तावात चीनने खोडा घातल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.

नवी6
author img

By

Published : Mar 14, 2019, 3:45 AM IST

नवी दिल्ली - 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात फेटाळण्यात आला. प्रस्तावात चीनने खोडा घातल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.

प्रस्तावामध्येभारताची साथ देणाऱ्या देशांचे परराष्ट्र मंत्रालयाने आभार मानले आहेत. बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे चीनने पुन्हा एकदा नकाराधिकारचा वापर केला. त्यामुळे मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा भारताचा प्रयत्न चौथ्यांदा अपयशी ठरला आहे.

मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवता न आल्याने आम्ही निराश झालो आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यासाठी कारणीभूत असलेल्या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यावर संयुक्त राष्ट्र संघाला कारवाई करता आली नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दहशतवादी संघटना, दहशतवादी नेत्यांविरोधात भारत नेहमीच कठोर भूमिका घेत राहणार आणि या नेत्यांवरील कारवाईसाठी भारताचे प्रयत्न यापुढेही सुरु राहतील, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Intro:सोलापूर : अपेक्षेप्रमाणे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि जेष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचं नांव सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून आज जाहीर करण्यात आलंय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या सोलापूरकरांनी देशाच्या गृहमंत्रीपदी असलेल्या सुशीलकुमारांना घरी बसवून भाजपच्या ऍड. शरद बनसोडे यांना दिल्लीला पाठवलं होतं. त्यानंतर आता पुन्हा लोकसभेची निवडणूक लागल्याने शिंदे नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत.

Body:2014 च्या लोकसभा निवडणुकीत
विद्यमान खासदार ऍड शरद बनसोडे यांनी शिंदे यांचा सुमारे दीड लाख मतांनी पराभव केला होता.मात्र आता सोलापुरातली परिस्थिती बदललीय. शरद बनसोडे यांना त्यांच्याचं पक्षातून विरोध होतोय.म्हणूनच सहकारमंत्री सुभाज देशमुख यांनी पुण्याचे राज्यसभा खासदार यांचं नांव पुढं केलं.त्याच्या वर कुरघोडी केली पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी. पालकमंत्र्यांनी लिंगायत मत लक्षात घेऊन धर्मगुरू डॉ जय सिद्धयेश्वर महास्वामी यांचं नांव पुढं केलंय.त्यामुळं सोलापूर लोकसभेसाठी भाकपचा उमेदवार कोण याचा गोंधळ आहे. काँग्रेसशी दोन हात करण्याऐवजी गटबाजीनं पोखरलेली भाजप पाडा पाडीच्या राजकारणात आतापासूनच व्यस्त असल्याचं दिसून येत आहे.त्यामुळं शहर- जिल्ह्यातील कार्यकर्ते गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत.

Conclusion:त्यामुळं सुशिलकुमारांच्या उमेदवारीनंतर आता सोलापूरकरांना प्रतीक्षा आहे ती शिंदे यांच्या विरोधात कोण कोण रिंगणात उतरणार याची...राजकीय पातळीवर उमेदवार जाहीर करण्यात सध्या भाजपचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.