बेल्लारी - कर्नाटकातील बेल्लारी येथील हम्पी उत्सवाच्या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तहानलेला हत्ती पाण्याने भरलेला टँकर थांबवताना दिसत आहे. हंपी उत्सवातील शोभा यात्रा म्हणजेच मिरवणुकीदरम्यान शुक्रवारी ही घटना घडली.
हेही वाचा - मनाली, रोहतांगचे सुंदर दृश्य; कोरोना-लॉकडाऊनमुळे प्रदूषणाची पातळी घटली
व्हायरल क्लिपमध्ये हत्ती पाण्याचा टँकर थांबवताना दिसत आहे. त्यानंतर हत्ती आपली तहान भागवरण्यासाठी टँकरच्या चालकाला टँकरचे झाकण उघडण्यासाठी सूचित करतो.
हत्ती आपल्याकडे येताना पाहून चालक घाबरला. परंतु, घटनास्थळावर उपस्थित राज्याचे वनमंत्री आनंदसिंह यांचा मुलगा सिद्धार्थ सिंह यांनी त्याला सर्व काही समजावले. त्यानंतर चालकाने टँकरचे झाकण उघडले आणि हत्तीला पाणी पिऊ दिले. तहान भागल्यानंतर हत्ती पुन्हा मिरवणुकीच्या दिशेने निघाला.
हेही वाचा - हिमाचल प्रदेशात येत्या 24 तासांत पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज