ETV Bharat / bharat

'कोरोना विषाणू हा नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत तयार झाला'

कोरोना विषाणू हा नैसर्गिक विषाणू नाही. हा प्रयोग शाळेत तयार करण्यात आलेला विषाणू आहे. यावर जगभरातील संशोधक लस शोधत आहेत. त्यामुळे आता आपण या विषाणू सोबत जगण्याची कला शिकायला हवी. हा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाल्याने यावर संशोधन करण्यासाठी उत्तम कार्यपद्धतीची गरज आहे. जेणेकरून त्याची लगेच ओळख पटवली जाईल, असे गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari
Nitin Gadkari
author img

By

Published : May 14, 2020, 8:23 AM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा उद्रेक हा चीनच्या वुहानमधून झाला आहे. यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पडला. हा विषाणू नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले विषाणू असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

कोरोना विषाणू हा नैसर्गिक विषाणू नाही. हा प्रयोग शाळेत तयार करण्यात आलेला विषाणू आहे. यावर जगभरातील संशोधक लस शोधत आहेत. आता आपण ही लस तयार होईपर्यंत या विषाणूसोबत जगण्याची कला शिकायला हवी. हा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाल्याने यावर संशोधन करण्यासाठी उत्तम कार्यपद्धतीची गरज आहे. जेणेकरून त्याची लगेच ओळख पटवली जाईल, असे गडकरी म्हणाले.

चीनच्या हुबेई प्रांतातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे केंद्रस्थान असलेल्या वुहान शहराची लोकसंख्या 11 दशलक्ष आहे. 11 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शहरातील सर्वांच्याच चाचण्या घेण्याच्या विचार चीन सरकार आहे. दहा दिवसांची चाचणी योजना तयार करण्याचे आदेश प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आले आहेत.

दरम्यान जगभरात कोरोनाच्या प्रसारास चीन जबाबदार असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा केले आहे. कोरोनाचा उगमही वूहान प्रयोगशाळेत झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

चीनमध्ये डिसेंबरच्या शेवटी कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा वुहान शहरातील प्रशासनाने याकडे गांभीर्याने घेतले नाही. उलट खोटी माहिती पसरवत असल्यावरून डॉक्टरांना तंबी दिली. पुढे जेव्हा चीनमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त झाला, या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टराच्या मृत्यूनंतर चीनमध्ये संतापाची लाट पसरली होती.मात्र, कोरोना चीनमधून आला यास पुरावे नसल्याचे चीनने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.