भोपाळ - मध्य प्रदेशमधील तृतीयपंथी असलेले सौरव किट्टू तांग याने स्पीती व्हॅलीमधील 6 हजार मीटरवर असलेले वर्जिन शिखर सर केले आहे. मध्य प्रदेशची महिला गिर्यारोहक मेघा परमार यांच्या प्रेरणेने सौरव किट्टू तांग याने हे शिखर गाठले आहे. इंडियन माउंटिंग फेडरेशनद्वारे परमिट माउंटन मोहिमेत सहभाग घेणारा सौरव किट्टू तांग हा पहिलाच तृतीयपंथी ठरला आहे.
सौरव किट्टू तांग सांगतात, मेघा परमारच्या प्रेरणेतून मी हे शिखर गाठले आहे. परमार यांच्याबद्दल मला माहिती मिळाल्यापासूनची मी त्यांना माझा गुरू मानतो. अतिशय कठीण परिस्थितीत त्यांनी वर्जिन शिखर सर केले होते. त्यामुळे तेव्हापासूनच मी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रशिक्षण सुरू केले होते. त्यानंतर अखेर हे शिखर सर केले आहे आणि याचा मला अभिमान वाटत असल्याचे सौरव किट्टू तांग यांनी सांगितले.
दरम्यान, या कार्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सौरव किट्टू तांग याचे अभिनंदन केले आहे.