नवी दिल्ली- गुंड विकास दुबे याच्या चकमक प्रकरणाचा तपास करणाऱ्या माजी पोलीस महासंचालक के.एल. गुप्ता, शशीकांत अग्रवाल यांना न्यायालयीन चौकशी आयोगातूूून काढावे. रवींद्र गौर यांना एसआयटीमधून काढून टाकण्याच्या मागणीसाठी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधील आणखी काही माजी पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना आयोगाचे सदस्य म्हणून नेमण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार घनश्याम उपाध्याय यांनी याचिका दाखल केली आहे. विकास दुबे चकमक प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.
उपाध्याय यांनी के.एल. गुप्ता यांनी या प्रकरणी माध्यमांना दिलेल्या निवेदनांचा हवाला दिला आहे. रवींदर गौरच्या बाबतीत, उपाध्याय यांनी असा दावा केला की ते बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आहेत. शशीकांत अग्रवाल यांनी न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांना न्यायालयीन कमिशनचे सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. उपाध्याय यांनी आय.सी. द्विवेदी, एस. जावेद अहमद, प्रकाश सिंग यांची नावे सुचविली आहेत.