ETV Bharat / bharat

ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ बी.पी.आर विठ्ठल बारू यांचे 93 व्या वर्षी निधन - विठ्ठल बारू यांचे निधन

ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि सेवानिवृत्त आयएएस अधिकारी बी. पी. विठ्ठल बारू यांचे शुक्रवारी पहाटे हैदराबाद येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.

 बी.पी.आर विठ्ठल बारू
बी.पी.आर विठ्ठल बारू
author img

By

Published : Jun 19, 2020, 2:57 PM IST

हैदराबाद - ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि सेवानिवृत्त आयएएस अधिकारी बी. पी. विठ्ठल बारू यांचे शुक्रवारी पहाटे हैदराबाद येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी सेशू, मुलगी निवेदिता कुमार, मुले संजय बारू आणि चैतन्य बारू, असा परिवार आहे. संजय बारू हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार होते.

विठ्ठल बारू हे 1950 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी होते. 1972 ते 1982 या काळात आंध्र प्रदेश सरकारचे वित्त व नियोजन सचिव होते, तर राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष व दहाव्या वित्त आयोगाचे सदस्य होते. ते केरळ सरकारमध्ये खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षपदीही होते. हैदराबाद येथे त्यांनी आर्थिक आणि सामाजिक अभ्यास केंद्र स्थापित केले आहे.

त्यांचे वडील बी.व्ही. राम नरसु हे वारंगल कला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि निझाम महाविद्यालयाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. हैदराबादच्या मदरसा-ए-आलिया हायस्कूलमध्ये शिक्षण घेत विठ्ठल यांनी मद्रास ख्रिश्चन महाविद्यालयामधून पदवी संपादन केली होती. 1950 मध्ये आयएएसची परिक्षा पास केली आणि नागरी सेवेत रुजू झाले.

विठ्ठल यांनी 1942 मध्ये हैदराबादच्या निजाम महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण सोडले आणि मुंबईतील इंडियन नॅशनल काँग्रेसच्या भारत छोडो अधिवेशनात भाग घेतला. त्यांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये स्वत: ला मग्न केले. ते एमसीसी विद्यार्थी संघटनेचे पहिले भारतीय अध्यक्ष होते.

विठ्ठल यांच्या नावावर अनेक प्रकाशने आहेत. 'तेलंगणा अधिशेष: एक केस स्टडी' या त्यांच्या निबंधाने तेलंगणाच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीला आकार देण्यासाठी प्रभावी भूमिका बजावली. 1960 मध्ये, विठ्ठल यांना उस्मानिया विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून नियुक्त केले गेले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.