ETV Bharat / bharat

'येथे' फक्त महिलाच चालवतात भाजीपाला बाजार - दिब्रुगड भाजीपाला बाजार न्यूज

आसामच्या दिब्रुगडमध्ये फक्त महिलांकडून चालवला जाणारा एक भाजीपाला बाजार आहे. जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांतील महिलांनी एकत्र येऊन हा बाजार सुरू केला आहे. स्वत:च्या शेतात पिकवलेला भाजीपाला, फळे आणि मत्स्यशेतीतील मासे घेऊन या महिला बाजारात विक्रीसाठी येतात.

महिलाच चालवतात भाजीपाला बाजार
महिलाच चालवतात भाजीपाला बाजार
author img

By

Published : Jan 19, 2020, 8:01 PM IST

गुवाहाटी - वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला आपल्या क्षमता तपासून पाहत आहेत. याचेच एक उदाहरण आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. दिब्रुगडमध्ये फक्त महिलांकडून चालवला जाणारा एक भाजीपाला बाजार आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच भाजीपाला बाजार आहे.

जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांतील महिलांनी एकत्र येऊन हा बाजार सुरू केला आहे. स्वत:च्या शेतात पिकवलेला भाजीपाला, फळे आणि मत्स्यशेतीतील मासे घेऊन या महिला बाजारात विक्रीसाठी येतात. सध्या या बाजारात 22 महिला विक्रेता म्हणून सहभाग घेत आहेत. बुधवारी आणि शनिवारी असे आठवड्यातील दोन दिवस हा महिलांचा भाजीपाला बाजार भरतो. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत महिला भाजी विक्री करतात.

हेही वाचा - ग्राहकाला व्हेज ऐवजी दिला नॉनव्हेज बर्गर; 'बर्गर किंग'ला ६० हजारांचा दंड

थेट शेतातून भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी आणले जातात. त्यामुळे ग्राहकांचा आणि आमचा प्रत्यक्ष व्यवहार होतो. ग्राहकांनाही ताजी आणि शुद्ध उत्पादने मिळतात आणि विक्रीतून मिळणारा नफा थेट आम्हाला मिळतो. आम्ही महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या उपक्रमामुळे आमच्या कुटुंबांना आर्थिक हातभार मिळत आहे. अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत, अशी माहिती एका भाजीपाला विक्रेता महिलेने दिली.

Intro:Body:

vbxcvbxcvb

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.