कानपूर (उत्तर प्रदेश) - शिवराजपूर ठाण्यांतर्गत धमनी निवादा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक बस व एक चारचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली. यात चारचाकी वाहनातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत.
धमनी निवादा गावाजवळील जीटी रस्त्यावर बस व चारचाकी वाहनात समोरा-समोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी वाहन चक्काचूर झाले आहे. ग्रामस्थांनी या अपघाताची माहिती पोलिसांनी दिली.
वाहनचालक रिंकू, रामकली आणि मायादेवी, असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. चारचाकीतील सर्वजण कानपूर येथे उपचारासाठी जात होते. अपघातानंतर काही वेळ याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
हेही वाचा - चायना मेड ड्रोन सीमेवर ठरताहेत डोकेदुखी; हत्यारे आणि अमली पदार्थांची तस्करी वाढली